Face Care Tips : त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी 'या' ओवरनाइट फेसपॅकचा वापर करा

Face Care : त्वचेशी संबधित समस्या धूळ, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे उद्भवतात.
Face Care Tips
Face Care TipsSaam Tv

Home-Made Face Pack : त्वचेशी संबधित समस्या धूळ, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे उद्भवतात. परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे त्वचेची फारशी काळजी घेता येत नाही. चेहऱ्यावरील त्वचेवर पिंपल्स ,डाग , टॅनिंग आणि पुरळ या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.

त्यासाठी तुम्ही रात्रीची (Night) स्किनकेअर रूटीन फॉलो केले पाहिजे. त्वचा निरोगी (Healthy) ठेवण्यासाठी तुम्ही रात्रीच्या वेळी काही नैसर्गिक गोष्टींचाही वापर करू शकता. अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण या गोष्टी आहेत. त्यामुळे रात्री चेहऱ्यावर लावल्याने त्वचा हायड्रेट राहते. ज्यामुळे त्वचेवर (Skin) नैसर्गिक चमक येते. चला तर मग जाणून घेऊया त्या फेस पॅक बद्दल माहिती.

Face Care Tips
Homemade Face Pack: ग्लोइंग त्वचेसाठी मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅकचा असा करा वापर!

ऑलिव्ह ऑईल आणि व्हिटॅमिन ई -

एका बाउलमध्ये व्हिटॅमिन ई थेंब आणि ऑलिव्ह ऑईल घालून मिक्स करून घ्या. हे तयार केलेले मिश्रण त्वचेवर आणि मानेवर लावून काही वेळ त्वचेवर मालिश करा. ते मिश्रण रात्रभर चेहऱ्यावर राहून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याने चेहरा धुवा.

ग्लिसरीन आणि नारळ तेल -

एका बाउलमध्ये ग्लिसरीनचे २ थेंब आणि १ थेंब नारळ तेल घालून या दोन्ही गोष्टी मिक्स करून घ्या. आता हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काही वेळ मालिश करा. हे मिश्रण रात्रभर असेच राहू द्या. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुवा.

Face Care Tips
Face Care Tips : वयाच्या 52 व्या वर्षी तब्बूसारखे दिसायचे आहे? हा फेसपॅक ठरेल फायदेशीर!

यामुळे तुमचा चेहरा हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. तसेच तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. नारळ तेलामध्ये फॅटी ऍसिड असते. जे तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. त्यात व्हिटॅमिन ई असते. हे तुमच्या त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवण्याचे काम करते.

कोरफड आणि गुलाब जल -

एका भांड्यात 1 ते 2 चमचे एलोवेरा जेल घ्या. त्यात गुलाब जलचे काही थेंब टाका. या दोन गोष्टी मिसळून चेहरा आणि मानेला मसाज करा. रात्रभर असेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी चेहरा साध्या पाण्याने धुवा.

कोरफड तुमची त्वचा मऊ ठेवण्यास मदत करते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. गुलाबजल तुमच्या त्वचेची पीएच पातळी राखण्यास मदत करते. त्यामुळे तुमची त्वचा चमकदार राहण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com