बिर्याणीची चव वाढवण्यासाठी या तांदळाचा वापर करा !

बिर्याणी बनवण्यासाठीही तांदळाची योग्य निवड कशी करावी.
Rice for Biryani, Kitchen tips, kitchen hacks, Tips and tricks
Rice for Biryani, Kitchen tips, kitchen hacks, Tips and tricks ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्रातील कोकणासारख्या भागात तांदळाचे पीक अधिक घेतले जाते. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ खाल्ले जातात. काहींना छोट्या तांदळाचा भात आवडतो तर काहींना लांब तांदळाचा.

हे देखील पहा -

तांदूळ (Rice) साधारणत: तीन प्रकारांमध्ये विभागला जातो लांब, मध्यम आणि लहान. हे तिन्ही प्रकारचे भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे तयार केले जातात. बिर्याणी ही प्रत्येक भागात चवीने खाल्ली जाते. पण कधी तिची चव चुकते तर कधी आपण तांदूळ निवडण्यास चुकतो. कोणत्याही प्रदेशात बिर्याणीचे नाव आली की तांदळाची आठवण येते. पण कोणता तांदूळ योग्य आहे ? तो योग्यरित्या कसे निवडावे? बिर्याणीसाठी योग्य तांदूळ कसा निवडायचा यासाठी काही टिप्स (Tips).

बिर्याणी बनवण्यासाठी योग्य तांदूळ कसा निवडायचा?

आपल्याला बिर्याणीची चव वाढवायची असेल तर त्यासाठी आपल्याला योग्य तांदूळ निवडणे गरजेचे आहे. तांदूळ छोटा आणि पाणी (Water) जास्त घातल्यास तो पुलाव होईल. बिर्याणी बनवण्यासाठी आपण बासमती तांदळाचा वापर करायला हवा. बासमती तांदूळ हा लांब आणि सुंगंधित असतो. हा तांदूळ बिर्याणी बनवण्यासाठी चांगला आहे कारण तो शिजवल्यानंतर भांड्याला चिकटत नाही. व्हेज किंवा नॉनव्हेज बिर्याणी बनवताना त्यासाठी नेहमी बासमती तांदूळ निवडा.

Rice for Biryani, Kitchen tips, kitchen hacks, Tips and tricks
पांढऱ्या शुभ्र दातांची काळजी कशी घ्याल ?

जुन्या बासमती तांदळापासून बिर्याणी बनवा

बिर्याणीसाठी बनवण्यासाठी बासमती तांदूळाची निवड करावी आणि दुसरे म्हणजे तो तांदूळ अधिक जुना असायला हवा. बासमती तांदूळ जर हलका पिवळा असेल तर तो जुना बासमती तांदूळ आहे हे लक्षात ठेवा. याउलट पांढरा असणारा तांदूळ हा नवीन असेल. तसेच, तांदळाचे काही दाणे खाल्ल्यास जर तो तांदूळ दातांना चिकटत असेल तर तो नवीन तांदूळ आहे हे समजून येईल.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com