Side Effects Earphones : इयरफोनच्या अतिवापरामुळे कायमचा बहिरेपणा; 18 वर्षांच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त

Loss Hearing Ability : एका १८ वर्षाच्या मुलांने TWS इयरबड्सचा बराच काळ वापर केल्याने त्याने ऐकण्याची क्षमता गमावली आहे.
Side Effects Earphones
Side Effects EarphonesSaam tv

Gorakhpur : आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा साथी हा इअरफोन असतो. कोणत्याही प्रवासात आपण इअरफोन्स, इअरबड्स किंवा हेडफोनचा वापर करु शकता. परंतु, याचा अतिवापर केला तर तुम्हाला आरोग्याच्या इतर समस्यांना समोरे जावे लागू शकते.

अशीच एक घटना उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये घडली आहे. एका १८ वर्षाच्या मुलांने TWS इयरबड्सचा बराच काळ वापर केल्याने त्याने ऐकण्याची क्षमता गमावली आहे.

Side Effects Earphones
Earphone Side Effects : इअरफोनचा अतिवापर ठरु शकतो; आरोग्याला घातक, WHO ने दिला वेळीच थांबण्याचा सल्ला

अनेकांना असे वाटते की, इअरफोनशिवाय (Earphone) जीवन जगणे कठीण आहे. प्रवास करताना किंवा गोंगाट तो आपलासोबती असतो खरा पण तासनतास त्याचा वापर केल्यास त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या कानाचे नुकसान होऊ शकते. कारण बहुतेक कानातले इअरफोन तुमच्या कानाच्या आत धोकादायक परिस्थिती निर्माण करतात.

TOI च्या रिपोर्टनुसार, इअरफोनचा जास्त वापर केल्यास व दीर्घकाळापर्यंत झालेल्या संसर्गामुळे मुलाची ऐकण्याची क्षमता कमी झाली होती, शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलाला काही प्रमाणात ऐकू येऊ लागले आहे. कानात सतत इअरफोन्स घातल्याने कानाच्या आतील आर्द्रता निर्माण होते. ज्यामुळे बॅक्टेरिया व विषाणूंना वाढवतात असे डॉक्टरांनी (Doctor) सांगितले आहे.

Side Effects Earphones
Heart Attack : earphones मुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जाणून घ्या कारणे

1. तज्ज्ञांनी दिला सल्ला

  • इअरबड्स किंवा हेडफोन वापरण्याचा कालावधी मर्यादित प्रमाणात असायला हवा. त्यासोबतच त्याचा आवाज देखील उच्च पातळीवर नको

  • ६० टक्केपेक्षा जास्त व्हॉल्यूम सेट करणे धोकादायक

  • ANC असणारे इअरबड्स वापरा ज्यामध्ये बाहेरचा आवाज रोखले जातात. ज्यामुळे तुम्हाला कमी आवाजाच्या पातळीवर ऐकता येईल.

  • कान नियमितपणे स्वच्छ (Clean) करा. घाण किंवा घाम साचू देऊ नका, ज्यामुळे संक्रमण होऊ शकते.

  • शक्य असल्यास, इअरबड्सऐवजी ओव्हर-इयर हेडफोन वापरा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com