Vande Bharat: वंदे भारतचा होणार कायापालट! स्लीपर कोचसह वंदे मेट्रोदेखील येणार प्रवाशांच्या सेवेत

Vande Metro : भारतीय रेल्वे सध्या वंदे भारतच्या नवीन स्लीपर कोचसाठी काम करत आहे.
Vande Bharat
Vande BharatSaam Tv

Vande Bharat Sleeper Coach and Vande Metro

भारतातील सर्वात जास्त सुसाट धावणारी ट्रेन म्हणजे वंदे भारत. वंदे भारतने नवनवे विक्रम केले आहेत. वंदे भारत ट्रेनमध्ये अनेक बदल होताना दिसत आहे. रंग, रुपानंतर आता या ट्रेनमध्ये स्लीपर कोच लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वे सध्या वंदे भारतच्या नवीन स्लीपर कोचसाठी काम करत आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) चे व्यवस्थापक बीजी मल्ल्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारतचा स्लीपर कोच चालू आर्थिक वर्षात सुरू केला जाणार आहे. पहिली ट्रेन सध्या तयार असून मार्च 2024मध्ये ही ट्रेन सुरू होईल.

Vande Bharat
IRCTC News: गावी जायचंय! एसटीचे तिकीट मिळत नाहीये? ऑनलाईन पद्धतीने करा तिकीट बुक

वंदे भारत स्लीपर ट्रेन ही भारतील रेल्वे ताफ्यातील महत्त्वाची ट्रेन ठरेल. या ट्रेनमधून आता रात्रभर लांब पल्ल्याचा प्रवास करणे सोपे होणार आहे. स्लीपर कोचमुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. रात्रीच्या प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुकर होणार आहे.. 'ICF वंदे मेट्रोदेखील विकसित करत आहे. वंदे मेट्रो ही 12 डब्ब्यांची ट्रेन असेल. ही ट्रेन कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरली जाईल. ही ट्रेन जानेवारी 2024 पर्यंत सुरू होईल'. असे मल्ल्या यांनी सांगितले.

'आम्ही या वर्षात वंदे भारतची स्लीपर कोच लाँच करणार आहोत. तसेच याच वर्षात वंदे मेट्रोदेखील लाँच करणार आहोत. ही ट्रेन नॉन एसी लोकांसाठी लाँच करणार आहोत. ट्रेनला नॉन एसी पुश पुल ट्रेन असेही म्हणतात. यात 22डबे आणि लोकोमोटिव्ह असेल. ही ट्रेन 31 ऑक्टोबरपूर्वी लाँच होणार आहे'. असे मल्ल्या म्हणाले.

वंदे भारत ही भारतातील सर्वात जास्त स्पीड देणारी ट्रेन आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये ही ट्रेन आपली सुविधा देते. वंदे भारतने भारतातील रेल्वे इतिहासात क्रांती घडवली आहे. आत्याधुनिक सुविधा पुरवल्या आहेत. तसेच प्रवासाचा वेळ कमी केला आहे.

15 फेब्रुवारी1019 रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली. या ट्रेन चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये तयार केल्या जातात. वंदे भारत ही हाय स्पीड ट्रेन आहे. हा प्रकल्प 1017 पासून सुरू झाला आहे. ICF चेन्नईने 'ट्रेन-18' चे काम जवळपास 18 महिन्यात पूर्ण केले. जानेवारी 2019 या ट्रेनचे नाव बदलून वंदे भारत एक्सप्रेस करण्यात आले.

Vande Bharat
Ganeshotsav 2023 : टाकाऊपासून टिकाऊ! काचेच्या बांगड्यांपासून बाप्पासाठी भन्नाट डेकोरेशन; कसं बनवायचं?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com