Varan Bhat : वरण-भात वर्षभरानंतर खाता येणार; काय सांगता राव, खरं हाय काय?

वेळेप्रसंगी काहीच नसेल तर, वरण भाताशिवाय पोट भरेल असा पदार्थच नाही.
Varan Bhat
Varan BhatSaam Tv

Varan Bhat : गरमा गरम भातवर वरण व त्यावर घातलेले साजूक तूप... ऐकताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल. अनेकदा हा वरण भात लहान मुलाला एक घास चिऊचा व एक घास काऊचा म्हणून भरवला जातो. वेळेप्रसंगी काहीच नसेल तर, वरण भाताशिवाय पोट भरेल असा पदार्थच नाही.

अनेकदा रात्री केलेलं अन्न दुसऱ्या दिवशी सकाळी शिळं होतं. काहीवेळा तर आपण सकाळचे जेवण रात्री खात नाही. पण पर्याय नसेल तर... हाच पर्याय सीमेवर आपल्या देशांसाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी असतो. अनेकदा चित्रपटात असे दाखवले जाते की, धान्य साठवण्यासाठी सैनिक बऱ्याच युक्त्या करतात. पण सीमेवर लढताना वाट्याला जे येईल ते खावे लागते.

Varan Bhat
Right Age to Get Married: लग्न करण्याचे योग्य वय कोणते?

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना विपरीत परिस्थितही देशाचं रक्षण करावं लागतं तसेच त्यात अनेक समस्यांना तोंड ही त्यांना द्यावे लागते. त्यामुळं त्यांच्या जेवणाची समस्या निर्माण होते. त्यातच वेळेप्रसंगी हाच उरलेला शिळा भात व वरण ते आनंदाने खातात.

सध्या नागपूरात आजपासून इंडियन सायन्स काँग्रेस DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेने संशोधित केलेल्या संशोधनांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. ही संस्था संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत तयार केलेल्या सैनिकांच्या अन्नपदार्थांचे एक स्टोल याठिकाणी आहे. सैनिक सीमेवर अत्यंत विपरित परिस्थितीत देशाचं रक्षण करत असतात. अशावेळी त्यांना जेवण तयार करायला वेळ किंवा साधन सामुग्री नसते. त्यामुळं त्यांच्यासाठी DRDO ने 'रेडी टू ईट' जेवण तयार केलंय. यात वरणभात, बिर्याणी, राजमा यांचा समावेश आहे. हे पॅकेट गरम करून ते पदार्थ खाता येतात. एक विशिष्ट प्रक्रिया करून हे पदार्थ वर्षभर टिकून राहते. आणि त्यातील पोषक तत्व वर्षभर कायम राहते.

Varan Bhat
Varan Bhat Canva

मात्र, सैनिकांसाठी काम करणाऱ्या DRDO संस्थेने वर्षभर टिकेल असं अन्न तयार केलंय. एक विशेष प्रक्रिया करून वरण-भात किंवा बिर्याणी वर्षभर खराब होत नाही. विशेष म्हणजे यातील पोषक घटक नष्ट होत नाही.

तसेच हल्ली 'रेडी टू ईट' सारख्या पदार्थांच्या चवी कधीही चाखतात. आता वर्षभर टिकणाऱ्या लोणच्यासारखा वरण-भात देखील कुठेही खाता येणार...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com