Vastu Tips: तुम्हीही तुमच्या पाकिटात जुनं बिल ठेवता, आजच टाकून द्या; अन्यथा....

तुमच्या पाकिटाशी संबंधित या चुका नेहमी टाळाव्यात, नाहीतर पैशांची चणचण कधीच संपणार नाही.
Vastu Tips
Vastu TipsSaam Tv

मुंबई: काही जण खूप मेहनत करतात खूप पैसा कमावतात. पण, तरीही ते नेहमी कंगाल राहातात. त्यांच्याकडे कधीही पैसा टिकत नाही. यामागे त्यांचा अवाजवी खर्च आणि बजेट न बनवता पैसा वाया जाणे यासारख्या चुका जबाबदार ठरतात. याशिवाय, अशा काही चुकाही होतात, ज्या वास्तूशास्त्रानुसार, देवी लक्ष्मीच्या नाराजीचे कारण ठरतात. तुमच्या पाकिटाशी संबंधित या चुका नेहमी टाळाव्यात, नाहीतर पैशांची चणचण कधीच संपणार नाही (Vastu Tips Avoid To Keep These Things In Purse Which Bring Financial Crisis).

Vastu Tips
Vastu Tips: तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली हवीये, फक्त 'हे' एक काम करा

फाटलेली पर्स (Purse) कधीही वापरु नये. असे केल्याने देवी लक्ष्मी (Goddess Lakshmi) क्रोधित होते आणि व्यक्ती दरिद्री होतो.

अनेकजण पर्समध्ये देवाचा फोटो ठेवतात किंवा असा कोणताही कागद ठेवतात ज्यामध्ये देवाचा फोटो असेल. त्यांची ही चूक त्यांना कर्जाच्या ओझ्याखाली ओढते. कर्ज टाळायचे असेल तर पर्समध्ये देवाचा फोटो ठेवू नका.

बरेच लोक पर्समध्ये आपल्या मृत नातेवाईकांचे फोटो ठेवतात, त्यामागे एक भावनिक ओढ असते.परंतु पर्समध्ये मृत व्यक्तीचा फोटो ठेवल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. यामुळे अशा लोकांकडे पैशाची नेहमीच कमतरता असते.

बरेच लोक त्यांच्या पर्समध्ये जुने बिल-पावत्यांचे बंडल घेऊन फिरत असतात. त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्याकडे नेहमी पैशांची कमी असते. त्यामुळे या गोष्टी कधीही पर्समध्ये ठेवू नका.

धारदार किंवा टोकदार वस्तू किंवा धातूच्या वस्तू कधीही पर्समध्ये ठेवू नका. ते नकारात्मकता आणतात आणि आर्थिक नुकसान करतात.

(टीप - वर दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.)

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com