
घरामध्ये सर्वकाही चांगलं सुरू असताना अचानक मोठी संकटे येऊ लागतात. बऱ्याचदा एक संकट टाळत नाही तोच दुसरं संकट उभं राहतं. अशात नेमकी गडबड काय झाली हे लक्षात येतं नाही. (Latets Marathi News)
बऱ्याचवेळी घरातली आजारपणे वाढतात. औषध उपचार करून देखील आजारपण सुटता सुटत नाही. यावेळी वास्तुदोष असण्याची शक्यता असते. वास्तुदोष टाळण्यासाठी या गोष्टी कायम लक्षात ठेवा.
घड्याळ
अनेकदा घरातील घड्याळामुळे संकटे येतात. त्यामुळे कधीही दुसऱ्याच्या घरातील घड्याळ आपल्या घरात लावू नका. हातावर बांधले जाणारे घड्याळ देखील स्वतःचे असलेले वापरा. मित्र, अथवा इतर कुणी वापरलेलं घड्याळ वापरू नका. दुसऱ्याचे घड्याळ वापरल्याने त्यांच्यावरील संकट आपल्यावर पालटू शकते.
फुटलेली काचेची भांडी
अनेकदा काम करताना काचेचे कप किंवा ग्लास चुकून तुटतात. चहाचे महागडे ट्रे एका कोपऱ्यात आदळल्यास त्यालाही चिर पडते. अशावेळी अनेकजण चहाचे ट्रे किंवा चिनीमातीची थोडीफार तुटलेली भांडी तसेच वापरतात. याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे अशा वस्तू तातडीने घरातून बाहेर काढाव्यात.
फुटलेला आरसा
घरामध्ये आसलेल्या आरशावर चिर गेली असेल अथवा आरसा तुटला असेल तर तेव्हाही विशेष काळजी घ्यावी. फुटलेल्या काचेमुळे दुखापत होण्याची शक्यता तर असतेच मात्र यामुळे घरात वाईट शक्ती फिरते. फुटलेल्या आरशाच्या काचा जर तुमच्या घरात असतील तर त्याही आताच फेकून द्या.
रात्रीच्या वेळी पैसे देणे
शक्यतो तुमचे व्यवहार दिवसाढवळ्या करा. घरामध्ये असताना काही वस्तू विकत घेतल्या किंवा कोणत्याही कारणासाठी सांजवेळी दारावर आलेल्या व्यक्तीला पैसे देऊ नका. रात्रीच्या वेळी लक्ष्मी बाहेर काढणे अशुभ माणले जाते.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.