VIRAL VIDEO:गर्जना करणारी सिंहिण महिलेच्या कुशीत; मेंदू सुन्न करणारा व्हिडिओ व्हायरल

रात्रीच्यावेळी हा व्हिडिओ काढण्यात आलेला असून त्यावेळी महिलेबरोबर कोणीही नसल्याचे दिसत आहे.
VIRAL VIDEO
VIRAL VIDEOSaam TV

VIRAL VIDEO:आजवर तुम्ही कुत्रा, मांजर किंवा माकड असे पाळीव प्राणी माणसांशी मस्ती करताना त्यांच्या अंगाखांद्यावर खेळताना पाहिले असतील. मात्र तुम्ही कधी हिंस्र प्राण्यांबरोबर खेळले आहात का? सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला रस्त्यावर चक्क सिंहिणीबरोबर मस्ती करताना दिसत आहे. तिने सिंहिणीला उचलून घेतलं आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर नेहमीच अनेक विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. मात्र हा व्हिडिओ (Video) पाहून अनेकांनी आपली भीती कमेंटबॉक्समध्येही व्यक्त केली आहे. व्हिडिओमध्ये महिला सिंहिणीला उचलून पळताना दिसत आहे. यावेळी सिंहिन देखील मोठ्या गर्जना करत आहे. रात्रीच्यावेळी हा व्हिडिओ काढण्यात आलेला असून त्यावेळी महिलेबरोबर कोणीही नसल्याचे दिसत आहे. म्हणजे सिंहिण सारख्या हिंस्र प्राणीबरोबर महिला आणि व्हिडिओ काढणारी एकच व्यक्ती असावी.

VIRAL VIDEO
VIRAL VIDEO : मध्य रात्री सुरक्षा रक्षकाचा भूताशी संवाद ? काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

महिला सिंहिणीला उचलून घेत गाडीच्या दिशेने येत आहे. तिने सिंहिणीला पोटाजवळ घट्ट धरून ठेवले आहे. मात्र सिंहीणीला खाली उतरायचे आहे. त्यामुळे ती मोठ्याने गर्जना करते. पण तरी देखील महिला तिला पोटाजवळ घट्ट धरून ठेवते. यात गाडीजवळ आल्यावर सिंहिण रस्त्यावर झेप घेताना दिसते आहे.

VIRAL VIDEO
खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंडाचा पाकिस्तानात मृत्यू, ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू

सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. इंस्टग्रामवरील (Instagram) twfeq या अकाउंटवर काल हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. फक्त एकाच दिवसात व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असून यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. या व्हिडिओने सर्वच थक्क झाले आहेत. एका यूजरने यावर कमेंट करत म्हटले आहे की, सिंहिणीची गर्जना फार भयावह आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, सिंहिण स्वत: एक पाळीव नाही तर हिंस्र प्राणी आहे हे विसरली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com