Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या निमित्ताने उत्तर प्रदेश येथील प्रसिद्ध शिव मंदिरांना भेट द्या!

Mahashivratri Speial : महाशिवरात्री हा सण भाविकांसाठी खूप महत्त्वाचा असतो.
Mahashivratri 2023
Mahashivratri 2023Saam Tv

Lord Shiva's Temples : महाशिवरात्री हा सण भाविकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या शुभ दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते. त्यामागचे कारण म्हणजे,फाल्गुन चतुर्दशीच्या तिथीला भगवान महादेवाने देवी पार्वतीसोबत विवाह करून तपश्चर्या सोडून ग्रहस्थ जीवनात प्रवेश केला.

तेव्हापासून हा दिवस महाशिवरात्र म्हणून साजरा करतात. अतिशय धार्मिक पद्धतीने हा दिवस साजरा (Celebrate) केला जातो. लोकांचा असा विश्वास आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्यास त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते.

महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर देशभरातील शिवालय आणि ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करतात. त्यामुळे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही देखील जवळपासच्या राज्यातील प्रसिद्ध शिवमंदिरांना (Temple) भेट देऊ शकता म्हणून आज आम्ही तुम्हाला उत्तरप्रदेश येथील प्रसिद्ध शिवमंदिरांनविषयी सांगणार आहोत.

Mahashivratri 2023
Mahashivratri 2023 : शिवलिंग कोसळून पुन्हा नव्याने येते एकत्र, अशा 'या' आश्चर्यकारक शिवलिंगाबद्दल जाणून घ्या

कशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग,बनारस -

उत्तर प्रदेशमध्ये स्थित काशी विश्वनाथ मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी सातव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे बाबा विश्वनाथ यांचे निवासस्थान आहे. या शहराला पृथ्वीवरील सर्वात पवित्र भूमी समजले जाते. तसेच हे भोलेनाथांचे सर्वात प्रिय शहर आहे. काशी भगवान शंकराच्या त्रिशुलावर विसावलेले आहे.

गोला गोकर्णनाथ उत्तरप्रदेश -

उत्तरप्रदेश मधील लखीमपूर येथे गोला गोकर्णनाथ मंदिर स्थित आहे. गोला गोकर्णनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी खूप दुरून भाविक येतात. असे म्हणतात की,जेव्हा सत्ययुगात रावण शंकर महादेवाला लंकेत घेऊन जात होता तेव्हा रावणाच्या मनात शंका आल्याने त्याने महादेवाला जमिनीवर ठेवले.

त्यानंतर ते जमिनीवरून हलू शकले नाही आणि रावणाने रागाच्या भरात शिवलिंग अंगठ्याने दाबले, लाखो प्रयत्न करूनही लंकापतींना ते शिवलिंग उचलता आले नाही. आजही येथील शिवलिंगावर रावणाच्या अंगठ्याचे ठसे आहेत असे म्हणतात. हे ठिकाण गोळा गोकर्णनाथ म्हणून प्रसिद्ध आहे.

Mahashivratri 2023
Mahashivratri 2023 : परदेशात आहात? मग भेट द्या 'या' शिवमंदिरांना

मनकामेश्वर मंदिर -

मणकामेश्वर मंदिर हे यमुना नदीच्या काठी वसलेले आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. येथे आलेले भाविक संगमाच्या पाण्याने भगवान शिवाला स्नान घालून महादेवाचे दर्शन घेतात. विशेषता सोमवार आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने लाखो भाविक मनकामेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात.

गड मुक्तेश्वर धाम -

उत्तर प्रदेशातील हापुर जिल्ह्यात गंगा नदीच्या काठावर गड मुक्तेश्वर धाम वसलेले आहे. परशुरामाने गडमुक्तेश्वर येथे महादेवाचे मंदिर स्थापन केले असे मानले जाते. गड मुक्तेश्वर धाममध्ये पुरातन शिवलिंग कारखंडेश्वर आणि मुक्तेश्वर महादेवाचे मंदिर आहे. येथे दरवर्षी भाविक लाखोच्या संख्येत दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात.

लोधेश्वर महादेव मंदिर -

लोधेश्वर महादेव मंदिर कानपूर येथे स्थित आहे. येथे दरवर्षी फाल्गुनी जत्रेसाठी मोठी गर्दी होते. लोक कानपूर येथून गंगाजल घेऊन महादेवाच्या दर्शनासाठी जातात. असे म्हटले जाते की, पांडवांनी वनवासात या मंदिराची स्थापना केली. महाशिवरात्रीचा सण येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com