खिशाला परवडणारे दोन नवे धाकड स्मार्टफोन भारतात लॉंच
Vivo T1 pro 5Gsaam tv

खिशाला परवडणारे दोन नवे धाकड स्मार्टफोन भारतात लॉंच

दोन नवे स्मार्ट फोन ग्राहकांसाठी उपलब्ध झाले असून त्यांची किंमतही १५ हजारांपासून सुरु आहे.

विवो कंपनीचे दोन नवे मोबईल स्मार्टफोन (Mobile smartphone) भारतात दाखल झाले आहेत. Vivo T1 pro 5g आणि Vivo T1 44W या मॉडेलचे नवे धाकड फोन ग्राहकांसाठी उपलब्ध झाले असून त्यांची किंमतही १५ हजारांपासून सुरु आहे. विवो कंपनीने हे दोन नवे फोन आज भारतात सादर केले आहेत. या स्मार्टफोनची Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर 66W Turbo फ्लॅश चार्ज सपोर्ट, अशी स्पेसिफिकेशन्स आहेत. तसंच फोनच्या मागच्या बाजुला ट्रिपल कॅमेरा सेटपही देण्यात आला आहे.

Vivo T1 pro 5G
मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरेंनी धर्म, संस्कृती, हिंदुत्व गहाण ठेवलं: सोमय्या

जाणून घ्या Vivo T1 Pro 5G आणि Vivo T1 44W या फोनची किंमत

Vivo T1 pro 5G च्या बेस व्हेरियंटमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल मेमरी दिली आहे. या फोनची किंमत 2399 एवढी ठेवण्यात आलीय. तसंच टॉप मॉडेलमध्ये 8GB रॅमसह 128 GB इंटरनल मेमरी दिली आहे. 24,999 रुपये एवढी या फोनची (Mobile) किंमत आहे. तसंच विशेष म्हणजे Turbo black आणि Turbo Cyan अशा कलरमध्ये फोनला सादर केला आहे. Vivo T1 44W या फोनला ची व्हेरियंट्समध्ये सादर केला आहे. या फोनच्या बेस व्हेरियंटमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी दिली आहे. या फोनची किंमत 14,499 एवढी आहे. तर या फोनच्या 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 15,999 इतकी ठेवण्यात आलीय. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 17,999 आहे. या फोनला Midnight Galaxy, starry Sky आणि Ice Dawn या कलर्समध्ये सादर केला आहे. Vivo T1 Pro 5G या फोनला प्री-बुकिंगसाठी ५ मेपासून उपलब्ध केलं जाणार आहे. त्यानंतर ७ मेपासून या फोनची विक्री केली जाईल. ई-कॉमर्स वेबसाईट्स Flipkart, वीवो ई-स्टोर आणि पार्टनर रिटेल स्टोर्समध्ये या स्मार्टफोनची खरेदी करु शकता.

Vivo T1 Pro 5G आणि Vivo T1 44W या फोनचे स्पेसिफिकेशन्स

Vivo T1 Pro 5G या फोनमध्ये 44-इंच Full HD+AMOLED स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेटनुसार दिली आहे. तसंच फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G 5G प्रोसेसर 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आलंय. हा फोन Android12-बेस्ड FuntouchOS आउट ऑफ द बॉक्सवर काम करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला गेला आहे. तसंच प्रायमरी कॅमेराही 64-मेगापिक्सेल एवढा आहे. त्याचसोबत 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर आणि एक 2-मेगापिक्सल का मॅक्रो सेंसरही दिला आहे. सेल्फी काढण्यासाठी समोरच्या बाजुला 16 मेगापिक्सल कॅमेरा लावण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,700MAH बॅटरी 66W फास्ट चार्जिंगसोबत दिली आहे.

Vivo T1 44W फोनमध्ये 6.44-इंच AMOLED स्क्रीन दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरही दिलं आहे. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेराही देण्यात आला आहे. तसंच प्रायमरी कॅमेराही 50-मेगापिक्सलचा आहे. याचसोबत २-मेगापिक्सलचा पोट्रेट आणि एक-२ मेगापिक्सलचा मॅक्रो शूटरही दिला आहे. तसंच फोनमध्ये 5,000mAhची बॅटरी 44W FlashCharge सपोर्टसह देण्यात आलीय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.