
Best Conditioner for Hair : बदलेल्या ऋतूनुसार केसांची अधिक गळती होऊ लागते. अचानक कोंडयाची किंवा केसगळतीच्या समस्येमुळे आपण वैतागतो. केस तुटण्यापासून ते केस गळतीपर्यंतची समस्या महिलांपासून पुरुषांपर्यंत प्रत्येकाला याचा त्रास होतो.
केसांना सुंदर, लांब व अधिक मजबूत बनवण्यासाठी अनेक वेळा महागडे उत्पादने वापरुन देखील केस गळती थांबत नाही. त्यासाठी स्वयंपाकघरातील (Kitchen) असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे तुमचे केस रेशमी, चमकदार व दाट होतील जाणून घेऊया त्याबद्दल.
बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी व प्रदूषणांमुळे आपली केस गळती होते असे अनेकदा सांगितले जाते. परंतु, त्याचे सर्वात मोठे कारण आहे ते केसांची नीटशी काळजी न घेणे.केसांना (Hair) पुरेशा प्रमाणात पोषकतत्व न मिळाल्यास केसांची वाढ खुटते. अनेक महागड्या उत्पादनांच्या वापरांमुळे,सतत बदलेल्या शॉम्पूमुळे केस गळती सुरु होते.
प्रसिद्ध योगगुरू, आचार्य प्रतिष्ठाना यांनी केसांची निगा राखण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत त्या म्हणतात की, महागड्या उत्पादनांवर पैसे (Money) वाया घालवण्यापेक्षा स्वयंपकाघरातील आढळणाऱ्या लिंबाचा वापर केसांसाठी करा. लिंबू हे नैसर्गिक कंडिशनर आहे ज्याचा केसांसाठी अधिक चांगल्याप्रकारे फायदा होतो.
1. कसे वापराल ?
केस आधी चांगल्याप्रकारे धुवा.
केस धुतल्यानंतर एका मगमध्ये एका लिंबाचा रस पिळून त्यात थोडे पाणी टाका. नैसर्गिक कंडिशनर तयार होईल.
आता हे कंडिशनर केसांना मुळापासून टोकापर्यंत लावा. यानंतर, सुमारे दहा मिनिटे केसांवर राहू द्या आणि केसांना हलके मसाज करा.
अवघ्या दहा मिनिटांनंतर साध्या पाण्याने केस धुवा.
लिंबू एक नैसर्गिक केस कंडिशनर आहे आणि ज्यामुळे केसांची वाढ होईल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.