Fruit and Mint Custard Recipe : जेवणानंतर काही गोड खायच आहे? तर फ्रूट अँड मिंट कस्टर्ड बनवून पाहा, जाणून घ्या रेसिपी

Sweet After Meal : कस्टर्ड हा गोड पदार्थ आहे. तुमची काहीतरी गोड खाण्याची इच्छा कस्टर्ड मिनिटात पूर्ण करू शकतो.
Fruit and Mint Custard Recipe
Fruit and Mint Custard RecipeSaam Tv

Fruit and Mint Custard After Meal : कस्टर्ड हा गोड पदार्थ आहे. तुमची काहीतरी गोड खाण्याची इच्छा कस्टर्ड मिनिटात पूर्ण करू शकतो. फळे आणि ड्रायफ्रुट्सने समृद्ध असलेली ही मलाईदार मिठाई खायला खरोखरच चविष्ट आहे.

ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला फळे (Fruit), दूध, साखर, व्हॅनिला इसेन्स, काजू, बदाम आणि पुदिना लागेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळे किंवा स्ट्रॉबेरी, किवी, सफरचंद, केळी, द्राक्षे आणि आंबा यांसारखी फळे घेऊ शकता.

Fruit and Mint Custard Recipe
Gulkand Karanji Recipe : घरच्या घरी बनवा गुलकंद करंजी, पाहा रेसिपी

पदार्थात गोडवा येण्यासाठी तुम्ही पांढऱ्या साखरे ऐवजी तुम्ही गूळ, ब्राऊन शुगर वापरू शकता. लहान मुलांपासून ते प्रौढ सर्वांना ही रेसिपी खूप आवडेल. तुम्ही घरातील (Home) कार्यक्रमानिमित्त फ्रूट कस्टर्ड डेझर्ट म्हणून सर्व्ह करू शकता.

फ्रूट अँड मिंट कस्टर्ड बनवण्यासाठी लागणारे साहित्य -

स्ट्रॉबेरी – 4, जर्दाळू – 4, व्हॅनिला इसेन्स – 4 थेंब, चिरलेला बदाम – 1 टीस्पून, किवी – 4, कस्टर्ड पावडर – 15 ग्राम, साखर – ¼ कप, चिरलेला काजू – 1 टीस्पून, पुदिन्याची पाने – 5, दुध – 150 मिली

Fruit and Mint Custard Recipe
Smoothie Recipe : दिवसभर शरीरात एनर्जी टिकवून ठेवायची आहे? तर ट्राय करा बदाम केळी स्मूदी, पाहा रेसिपी

फ्रूट अँड मिंट कस्टर्ड बनवण्याची पद्धत -

स्टेप 1 – सर्व फळे पाण्याने स्वच्छ करून कापून लहान चौकोनी तुकडे करून घ्या.

स्टेप 2 – कस्टर्ड सोल्युशन बनवण्यासाठी दुधामध्ये कस्टर्ड पावडर आणि साखर मिक्स करा.

स्टेप 3 – उरलेले दूध एका भांड्यात दहा मिनिटे उकळून घ्या. आता त्या उकळलेल्या दुधात आपण तयार केलेले कस्टर्ड मिश्रण घाला आणि चांगले फेटा.

स्टेप 4 – आता कस्टर्डमध्ये चिरलेली फळे ,बदाम , काजू, पुदिन्याचे पाने आणि व्हॅनिला इसेन्स घाला. कस्टर्डला थंड होऊ द्या. नंतर आणखी थंड होण्यासाठी कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर हे कस्टर्ड सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com