
Footwear For Women : प्रत्येकाची इच्छा असते की, आपण चांगले दिसावे. यामुळे लोक तुमच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. त्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टचा वापर करतात. त्यासोबतच तुम्ही हेअर जेल सुद्धा वापरू शकता.
तसेच ड्रेस कोड, फुटवेअर, शूज कडे लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींमुळे प्रॉपर लूक तयार होतो. तुम्ही फुटवेअरमध्येही ब्युटीफुल लूक तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या शू रॅकमध्ये या पाच प्रकारचे फुटवेअर अॅड करण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊया फुटवेअर बद्दल संपूर्ण माहिती.
1. कोल्हापुरी चप्पल
कोल्हापुरी चप्पल अतिशय कम्फर्टेबल आणि फॅशनेबल (Fashion) आहे त्यामुळे तुमच्या शू रॅकमध्ये तुम्ही कोल्हापुरी चप्पल ऍड करू शकता. कोल्हापुरी चप्पल स्पेशली कुर्तीसोबत घातल्याने खूप छान लुक तयार होतो. हल्ली कोल्हापुरी चप्पलचा ट्रेंड ही सुरू आहे. तसेच कोल्हापुरी चप्पलची जगभरात मागणे वाढले आहे.
2. सिंथेटिक सँडल्स
लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे त्यामुळे या मोसमात तुम्ही सिंथेटिक सँडलचा वापर करू शकता. या सँडल्स अतिशय कंफर्टेबल आहे. त्यासोबतच या सँडल्स तुमच्या बजेटमध्ये (Budget) उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शू रॅकमध्ये वॉटरप्रूफ किंवा लेदर सिंथेटिक सँडल्स ऍड करू शकता.
3. क्रॉस सँडल्स
वीकेंडला तुम्ही क्रॉस सॅंडल वापरू शकता. जर तुम्हाला स्वतःला टाईम टू अपडेट कॅटेगरीमध्ये सामील करायचे असेल तर तुम्ही क्रॉस सँडल्स निवडू शकता. क्रॉस सँडल्स कम्फर्टेबल आहे आणि या सँडल्स हंक लुक देतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रॉस सँडल्स तुम्हाला बजेटमध्ये मिळतात.
4. स्ट्रॅपी लेदर सँडल्स
या सँडल्स तुम्हाला कॅज्युअल किंवा फॉर्मल आऊटफिट सोबत खूप छान लुक देतात. जॅकेट सोबत स्ट्रॅपी लेदर सँडल हा उत्तम पर्याय असू शकतो. या सँडल्सने जेंटलमैन लुक तयार होतो. फेस्टिव्ह सीझनमध्येही तुम्ही स्ट्रॅपी लेदर सँडल्सचा वापर करू शकता.
5. हिल्स सँडल्स
लग्न (Marriage ) किंवा रिसेप्शनमध्ये सुंदर दिसण्यासाठी तुम्ही हिल्स सँडल्सचा वापर करू शकता. या सँडल्स दिसायला अतिशय आकर्षित असतात आणि वेगवेगळ्या रंगात तुम्ही हिल सँडल्स खरेदी करू शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.