How to Increase Sex Stamina : लैंगिक संबंधांची क्षमता वाढवायची आहे? 'या' पेयाचे सेवन करा

जोडीदाराबरोबर लैंगिक संबंध ठेवताना पार्टनरच्या प्लेजरचीही काळजी घेतली पाहिजे.
Relationship
RelationshipSaam Tv

How to Increase Sex Stamina : शारीरिक आकर्षण, चांगले लैंगिक जीवन, इंटिमेट आणि सेक्स आदि बोलण्याबाबत आजही लोक संकोच बाळगतात. ज्या पद्धतीने भुकेसाठी जेवण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीराला लैंगिक संबंधाची गरज असते. लैंगिक संबंध आणि सुख प्राप्त करणे हेही प्रत्येकाच्या आयुष्यासाठी भिन्न असते.

जोडीदाराबरोबर लैंगिक संबंध ठेवताना पार्टनरच्या प्लेजरचीही काळजी घेतली पाहिजे. यासाठी लैंगिक क्षमता म्हणजेच सेक्स पॉवर चांगली असणे आवश्यक आहे.

Relationship
Relationship Tips : 'या' स्वभावाचे पुरुष सहज जिंकतात स्त्रियांचे मन, 'हे' गुण तुमच्यात आहेत का ?

लैंगिक संबंध हे आयुष्यातील एक सुखद अनुभव आहे, परंतु प्रत्येक वेळी स्त्री किंवा पुरुष जोडीदाराला आनंदाची अनुभूती देईलच असे नाही. कधी कधी असं होऊ शकतं की तुमच्या दोघांमध्ये लैंगिक संबंध झाल्यावर त्या दोघांच्या मनात जे समाधान हवंय ते मिळालेलं नाही. काहीवेळा शारीरिक कमतरता किंवा संभोगाला पुरेसा वेळ न देणे हेही यामागे मोठे कारण असते.

सेक्सोलॉजिस्टच्या मते, जर लैंगिक संबंधादरम्यान ऑर्गेज्म होण्याच्या स्थितीपूर्वी शांत झालात तर ते नातेसंबंधाचा आणि जोडीदाराचा विश्वास गमावण्याचे एक मोठे कारण आहे. म्हणूनच आहारात काही पेये समाविष्ट करून वेळ घालवणे महत्वाचे आहे, ज्यामुळे जोडीदाराला हवा असलेला आनंद अनुभवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते पेय, जे बुडत्या आणि निराश झालेल्या सेक्स लाईफला पुन्हा एकदा गती देऊ शकतात.

कोरफड ज्यूस -

कोरफड अनेक फायदेशीर घटकांनी समृद्ध आहे आणि त्वचेपासून केसांपर्यंतच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. परंतु अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोरफडीचा रस मनुष्याची लैंगिक आणि कामुक क्षमता वाढवण्यासाठी देखील प्रभावी आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की कोरफड पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवते, जे पुरुषांमधील त्यांच्या लैंगिक क्षमतेमध्ये एक प्रमुख घटक आहे आणि इतर वैशिष्ट्यांमुळे ते स्त्रीपेक्षा वेगळे आहेत. ज्या पुरुषांना केस गळण्याची समस्या आहे किंवा ज्यांच्या शरीरात केस कमी आहेत, त्यांच्यासाठी मुख्यतः टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स जबाबदार असतात.

जर कोरफडीचा ज्यूस प्यायलात तर लैंगिक जीवन अधिक चांगले होऊ शकते. परंतु याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात, म्हणून कृपया वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

Relationship
Relationship Tips : Ex सोबत ब्रेकअप झालंय? त्याला विसरता येत नाहीये ? 'हा' उपाय करा

केळ्याचे मिल्क शेक -

कमकुवत आणि दुबळे शरीर मजबूत करण्यासाठी, दूध आणि केळीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. केळ्यामध्ये ब्रोमेलेन एंजाइम आढळते ज्यामुळे मानवी शरीरात कामुक इच्छा वाढते. केळ्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात, जी शरीराचा आकार लवकर वाढवण्यास मदत करतात आणि त्यामुळे काही दिवसांत वजनही वाढते, त्यामुळे सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी रोज 'केळी मिल्क शेक' देखील घेऊ शकता.

कलिंगडचे ज्यूस -

कामुक क्षमता वाढवण्यासाठी टरबूजाचा रस पुरुषांसाठी वरदान आहे. त्यात एल-सिट्रुलीन हे मूलद्रव्य असते, जे अमीनो ऍसिडमध्ये समृद्ध असते. यामुळे पुरुषांची लैंगिक क्षमता वाढते. त्यात आढळणारे एल-सिट्रुलीन तत्व शरीरात एल-आर्जिनिनमध्ये रूपांतरित होते आणि त्यामुळे शरीरात तयार होणारा नायट्रिक ऑक्साईड वाढतो.

Relationship
Relationship Tips : तुमच्या जोडीदाराला शरीर संबंधात खुश करायचे आहे ? 'या' टिप्स फॉलो करा

दूध -

दूध हे नेहमीच फायदेशीर घटकांनी युक्त असा पदार्थ आहे. शरीरातील कोणत्याही प्रकारची कमजोरी किंवा अशक्तपणा दूर करण्यासाठी हे रामबाण औषध आहे. दुधाची शक्ती शरीरात त्वरित ऊर्जा प्रवाहित करते हे यावरून समजू शकते. या कारणास्तव, लग्नानंतरच्या पहिल्या रात्री (सुहागरात) वराला दूध देण्याची परंपरा आहे जेणेकरून लैंगिक संबंध ठेवताना शक्ती वाढेल. त्यामुळे जेव्हाही तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जवळीक साधाल तेव्हा शक्य असल्यास काजू घालून एक ग्लास दूध प्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Shraddha Thik

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com