Coriander Fresh : उन्हाळ्यात कोथिंबीर अधिक काळ फ्रेश ठेवायची आहे? या टिप्स फॉलो करा

Coriander : भारतामधील कुठलाही पदार्थ कोथिंबिरीशिवाय पूर्ण होत नाही.
Coriander Fresh
Coriander FreshSaam Tv

How To Keep Coriander Fresh : भारतामधील कुठलाही पदार्थ कोथिंबिरीशिवाय पूर्ण होत नाही. जेवण बनवण्यापासून ते अनेक उपचारांमध्ये कोथिंबिरीचा वापर केला जातो. कोथिंबीरीच्या पानापासून ते देठांपर्यंत प्रत्येक भाग अतिशय फायदेशीर असतो.

पण जिथे चवीची आणि गार्निशिंगची गोष्ट येते तेव्हा कोथिंबीरीची पाने जास्त प्रमाणात वापरली जातात. परंतु कोथिंबिर लवकरात लवकर खराब होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्येतर कोथिंबिरीची पाने काही वेळांमध्ये सूकून जातात.

Coriander Fresh
Coriander Chutney : उन्हाळ्यात बनवा राजस्थानी स्टाईल कोंथिबीरीची चटणी, शरीराला होतील अनेक फायदे !

एवढेच नाही तर फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा कोथिंबीर टवटवीत राहत नाही. या कारणामुळे कोथिंबीर दुसऱ्यावेळी वापरता येत नाही. मग ती कोथिंबीर आपल्याला फेकून द्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला कोथिंबीर कशा पद्धतीने फ्रीजमध्ये फ्रेश राहील याबद्दल काही टिप्स (Tips) सांगणार आहोत.

ही टीप वापरून कोथिंबीर राहील एक ते दोन आठवडे फ्रेश -

कोथिंबीर पासून पाने आणि खराब पाने वेगळे करा. एका कंटेनरमध्ये पाणी आणि एक चमचा हळद टाका. पाण्यामध्ये (Water) कोथिंबीरची पाने 30 मिनिटे भिजत ठेवा. आता पानांना पाण्यामधून काढून सुकवून घ्या.

Coriander Fresh
Coriander Benefits: थायरॉइडच्या आजारावर बहुगुणी ठरेल कोथिंबीर !

आता दुसऱ्या कंटेनरमध्ये पेपरटॉवेल टाकून कोथिंबीरीची पाने त्यावरती टाका. त्यानंतर त्या कंटेनरला दुसऱ्या टॉवेल पेपरने झाका. त्यानंतर ही कोथिंबीर फ्रिजमध्ये स्टोअर करा. असं केल्याने तुमची कोथिंबीर खराब होणार नाही.

एक महिन्यापर्यंत राहतील कोथिंबीरची पाने फ्रेश -

कोठांबिरीची पाने मुळापासून कापून वेगळी करा. तया मधून खराब किंवा पिवळी पाने बाजूला करा. त्यानंतर कोथिंबीरीला एका एअरटाईट कंटेनरमध्ये टिश्यूच्यामध्ये ठेवून बंद करा. आताही पाने फ्रिजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवून द्या. परंतु स्टोअर करण्याआधी पाने धुण्याची चूक करू नका. असं केल्याने तुमची कोथिंबीर खराब होईल. तुम्ही जेव्हा कोथिंबीर वापराल तेव्हा ती कोथिंबीर तुम्ही धुवून घ्या.

कोथिंबीर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा -

कोथिंबीर खरेदी करताना फक्त किंमतच नाही तर, कोथिंबिरीचा आकार, कोथिंबीरचा वास या सगळ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर जेवणामध्ये सुगंध ही येणार नाही आणि चव ही येणार नाही.

त्यामुळे कोथिंबीर खरेदी करताना नेहमी छोट्या पानांची, हलकी हिरव्या रंगाची आणि सुगंधीत असलेली कोथिंबीर खरेदी करा. अशा पद्धतीने कोथिंबीर शुद्ध असते. स्टोअर करण्यासाठी देखील चांगली असते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com