
Face Care Tips : तब्बू ही भारतीय चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे वय 52 वर्ष आहे. तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीणच आहे. तिने तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे असे उघडकीस आले आहे.
वयाची अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर कोणतीच व्यक्ती वृद्धत्वाचे प्रतिक्रिया लपवू शकत नाही. एका वयानंतर चेहऱ्यावरील घट्टपणा कमी होऊन त्वचा (Skin) लोंबायला लागते आणि सुरकुत्या वाढू लागतात. अशा वेळेस तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही तब्बू सारखे तरुण दिसाल त्यासाठी या पदार्थांबद्दल जाणून घ्या
कोथिंबीर -
स्वयंपाक (Kitchen) घरात उपलब्ध असलेली कोथिंबीर तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर असते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सीडेंट असतात जे त्वचेला फ्री रायडिकलच्या हल्ल्यापासून संरक्षण करतात. कोथिंबीरची चटणी खाल्ल्याने त्वचा डिटॉक्स राहते आणि चेहऱ्यावर पिंपल्स येणे कमी होते. चला तर मग जाणून घेऊया कोथिंबीरचा वापर करून त्वचेची काळजी कशी घेता येईल.
कोरड्या ओठांपासून मुक्ती मिळेल -
ओठांनवर वाढत्या वयाचा परिणाम दिसून येतो. वयाच्या 50 च्या आसपास ओठ कोरडे आणि निर्जीव दिसायला लागतात. त्यामुळे कोथिंबीर मिक्सर ग्राइंडर मध्ये बारीक करून ओठांवर ती पेस्ट लावा. पंधरा-वीस मिनिटानंतर ते कोरडे झाल्याने कोमट पाण्याने स्वच्छ करा. नियमितपणे असे केल्याने तुमचे ओठ गुलाबी आणि मऊ होण्यास मदत मिळेल.
सुरकुत्या कमी होतील -
सुरकुत्या कमी करण्यासाठी सर्वप्रथम हिरवे धने, दही, कोरफड जेल आणि गुलाब जल एकत्र मिसळून घ्या. ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिटांसाठी ठेवा. चेहऱ्यावरचा ओलावा कमी झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. ही पेस्ट नियमितपणे वापरून तुम्ही चेहऱ्यावरच सुरकुत्या दूर करू शकता. त्यासोबतच चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यास मदत होईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.