Aloe Vera Benefits For Hair : केसांना घनदाट व मुलायम करायचे आहे? कोरफडीचा असा करा वापर, होतील एकदम स्ट्रेट

Aloe Vera Benefits : बऱ्याचदा कोरफडीचा वापर आपण स्किन केअरसाठी करत असतो.
Aloe Vera Benefits For Hair
Aloe Vera Benefits For HairSaam Tv

Hair Home Remedies : बऱ्याचदा कोरफडीचा वापर आपण स्किन केअरसाठी करत असतो. परंतु तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो की, कोरफडीचा वापर तुम्ही केसांच्या समस्येसाठी देखील करू शकता.

कोरफड तुमच्या केसांना घनदाट, लांब आणि मुलायम बनवण्याचे काम करते. खरंतर एलोवेरामध्ये अमिनो ऍसिड, फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन (Vitamin) ए, बी, सि, डी सारखे अनेक पोषकतत्वे उपलब्ध असतात.

Aloe Vera Benefits For Hair
Aloe Vera Juice Benefits : अॅनिमियापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत दररोज प्या कोरफडचा ज्यूस, आरोग्याला होतील जबरदस्त फायदे!

जे केसांना मजबूत बनवण्यासोबत अनेक समस्यांना दूर करण्याचे काम करतात. एलोवेराचा वापर हेअर केअरसाठी कशा पद्धतीने करावा या बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही कोरफडीचा वापर हेअर स्प्रे म्हणून करू शकता. केसांना (Hair) घनदाट आणि प्रॉब्लेम फ्री ठेवण्यासाठी अशा पद्धतीने कोरफडीचा वापर करून तुम्ही फायदे मिळवू शकता. हा हेअर स्प्रे बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एका वाटीमध्ये एलोवेरा जेल घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये एक चतुर्थांश अद्रकचा रस मिसळवायचा आहे.

Aloe Vera Benefits For Hair
Hair Care Shampoo : केसांना सिल्की व शायनी बनवायचे आहे ? घरच्या घरी तयार करा असा शॉम्पू

आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. तुम्हाला जेव्हा हा स्प्रे केसांना लावायचा असेल तेव्हा केस सर्वात आधी फणीने व्यवस्थित विंचुरून घ्या. त्यानंतर केसांच्या मुळापासून ते केस संपतात तिथपर्यंत तुम्हाला हेअर स्प्रे अप्लाय करायचा आहे. जेव्हा तुमच्या केसांना हे मिश्रण व्यवस्थित अप्लाय होईल तेव्हा केस वरती बांधून ठेवा. आता अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेलचा वापर हेअर मास्क म्हणून देखील करू शकता. हेयर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी एलोवेरा जेल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये दही मिसळवायचे आहे.

आता या मिश्रणामध्ये दोन चमचे मध मिक्स करून चांगल्या प्रकारे फेटून घ्या. आता हे मिश्रण केसांच्या मुळांपर्यंत लावा. हा हेअर मास्क तुमच्या केसांना चमकवेल आणि तुटलेली केस पुन्हा रिपेअर होण्यास मदत होईल. पहिल्याच वापरामध्ये तुमची केस अतिशय मुलायम आणि सॉफ्ट बनतील.

जर तुम्हाला केसं वारंवार धुवायचे नसतील तर तुम्ही एलोवेराचा वापर लिव इन कंडिशनर म्हणून देखील करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी एका वाटीमध्ये एलोवेरा जेल घ्यायचे आहे. त्यानंतर जेलमध्ये एक ते दोन थेंब असेन्शियल ओईल घ्यायचे आहे.

आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून केसांना लावून घ्या. तुम्हाला हे मिश्रण जास्त प्रमाणात केसांना लावायचे नाही आहे. फक्त एक चमचा मिश्रण हातामध्ये घेऊन केसांना लावायचे आहे. केल्याने तुमचे केसरी दिसणार नाहीत आणि सोबतच मुलायम देखील राहतील.

तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एलोवेरा जेल डायरेक्ट केसांवरती लावू शकता. एलोवेराच्या सतत वापराने तुमची हेअर ग्रोथ चांगल्या प्रकारे होईल आणि तुमची केस हेल्दी बनतील. त्यासाठी तुम्हाला एक कोरफड कापून घ्यायची आहे.

ती कोरफड मधोमध चिरून तिथे दोन भाग करायचे आहेत. त्यानंतर दोन हातात दोन भाग पकडून केसांवरती रब करायचे आहे. असं केल्याने तुमच्या केसांची सगळी समस्या दूर होईल आणि सोबतच तुम्हाला एलोवेरा जेलचे बेनिफिट्स देखील मिळतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com