उन्हाळ्यात 'ही' फळे खा आणि शरीरातील पाण्याची पातळी वाढवा..!

Best Hydrating Summer Fruits : बाजारात मिळणाऱ्या नीरा, कोल्ड ड्रिंक, लिंबू पाणी किंवा ताक हे पेय पदार्थ आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात.
उन्हाळ्यात 'ही' फळे खा आणि शरीरातील पाण्याची पातळी वाढवा..!
Water Rich Fruits To Keep Your Hydrated in Summer, How to hydrate body in summer, Summer Health Tips Saam Tv News

मुंबई: उन्हाळा म्हटलं की अंगाची लाही लाही होत असते. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन थकवा जाणवत असतो. अशावेळी आपली पावले सहज थंडगार पेयांकडे वळतात. बाजारात मिळणाऱ्या नीरा, कोल्ड ड्रिंक, लिंबू पाणी किंवा ताक हे पेय (Drinks) पदार्थ शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्याचे कार्य जरी करत असले तरी ते आपल्या शरीरासाठी योग्य आहे का? अशावेळी आपल्या शरीराला कोणत्या पेयांची जास्त आवश्यकता असते हे देखील आपल्याला कळायला हवे. (Water Rich Fruits To Keep Your Hydrated in Summer)

हे देखील पाहा -

बाजारात मिळणाऱ्या नीरा, कोल्ड ड्रिंक, लिंबू पाणी किंवा ताक हे पेय पदार्थ आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. हे ऐकून खरंतर तुम्हाला धक्का बसेल परंतु यासाठी वापरले जाणारे पाणी व आपल्याला न कळणाऱ्या रासायनिक पदार्थांचा समावेश यात केला जातो. तसेच यात साखरेचे प्रमाण देखील अधिक असते त्यामुळे अशा पेयांचे सेवन केल्यास शरीरातील साखरेची पातळी सहज वाढते व आपण अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. उन्हाळ्यात (Summer) घराबाहेर पडताना पेयांऐवजी तुम्ही पाणीदार फळांचा (Fruits) समावेश करू शकता. त्यामुळे शरीरातील पाण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल व साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहील.

या फळांचा करा समावेश

१. कलिंगड - उन्हाळ्यात अधिक प्रमाणात कलिंगडाचे सेवन करायला हवे. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहते व पाण्याची कमतरता देखील भासत नाही. उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन केल्यास त्वचेसाठी देखील फायदा होतो.

२. संत्री - उन्हाळ्यात येणा-या घामामुळे शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण कमी होत जाते त्यामुळे आपल्याला सतत थकवा जाणवतो. संत्रीचे सेवन केल्यास शरीरात असणारे पाण्याचे कमी प्रमाण भरून निघते.

३. द्राक्षे - द्राक्षात अधिक प्रमाणात पाणी असते. तसेच उन्हाळ्यात द्राक्ष खाल्याने तहान व भूक दोन्ही मिटवल्या जाऊ शकतात.

४. अननस - उन्हाळ्यात अननसाचे सेवन केल्यास शरीरातील फॅट्स व प्रोटीन सहजपणे पचते तसेच शरीरातील उष्णतेला नियंत्रणात ठेवता येते.

Water Rich Fruits To Keep Your Hydrated in Summer, How to hydrate body in summer, Summer Health Tips
Koffee With Karan: बॉलिवूडचे गॉसिप राहणार गुपितच! करण जोहरचा भावनिक पोस्ट लिहून खुलासा

५. आंबा - फळाचा राजा आंबा उन्हाळ्यात सर्वत्र आपल्याला दिसतो. आंब्याचे सेवन केल्यास शरीराला थंड ठेवण्यास मदत होते.

६. लिंबू - घरात बाजारात सर्वच ठिकाणी मिळणारे फळ लिंबू. लिंबात अधिक प्रमाणात जीवनसत्त्वे असते. लिंबाचा रस प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होऊन ऊर्जा मिळते.

७. खरबूज - उन्हाळ्यात अगदी स्वस्त व सहज प्रमाणात मिळणारे फळ खरबूज. खरबूज हे पाणीदार फळ असल्याने त्याचे अधिक सेवन करावे.

ही व अशी अनेक प्रकारची फळे बाजारात सहज व स्वस्त दरात उन्हाळ्यात उपलब्ध असतात. या फळांचे सेवन केल्यास शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी होईल. शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्त्वे देखील मिळेल.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.