उन्हाळ्यात या कपड्यांचे परिधान करा आणि असे दिसा स्टायलिश

तुमच्या वॉर्डरोबमधे या कपड्यांचा समावेश करा.
उन्हाळ्यात या कपड्यांचे परिधान करा आणि असे  दिसा स्टायलिश
Fashion tips in marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : लॉकडाउननंतर पुन्हा ऑफिस (Office), मित्र- मैत्रिणींना भेटणे, पार्टीला जाणे सुरु झाले आहे. परंतु वाढत जाणाऱ्या उकड्यामुळे जीव नकोसा होतो ऑफिसला किंवा पार्टीला (Party) जाताना योग्य पोशाख निवडणे खूप महत्वाचे आहे. घाम आणि अति घट्ट कपड्यांमुळे सतत थकवा आणि अस्वस्थ वाटते उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी, आपण सतत थंड पदार्थांचे सेवन करतो आणि अधिकाधिक घरात राहायला पसंती देतो, परंतु घरामध्ये दिवसभर राहणे शक्य नाही.

हे देखील पहा -

आपल्याला ऑफिस, मित्र- मैत्रिणींना भेटणे, पार्टी किंवा कौटुंबिक सहलीला (Trip) जाणे आवडते. अशा परिस्थितीत, तुम्ही कोणते कपडे परिधान करायला हवे ज्यामुळे तुम्ही उष्णतेपासून तर वाचाल शिवाय तुम्ही आरामदायक आणि स्टायलिश दिसाल.

उन्हाळ्याच्या दिवसांत तुमच्या वॉर्डरोबमध्ये हे कपडे असायला हवे.

१. कफ्तान -

कफ्तान पुन्हा एकदा फॅशनच्या ट्रेंडमध्ये दिसून येत आहे. हा ड्रेस अतिशय हलका आणि हवेशीर आहे. आजकाल बाजारात कफ्तानचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, त्यापैकी शिफॉनपासून कॉटनपर्यंत कफ्तान्सची खरेदी आपण करू शकतो. उन्हाळ्यात वॉर्डरोबमध्ये दोन किंवा तीन कफ्तान कपडे नक्की समाविष्ट करा.

Fashion tips in marathi
मुलांच्या टिफीन बॉक्समध्ये; हे आरोग्यदायी पदार्थ द्या!

२. स्टायलिश म्हणजे मोठ्या आकाराचा शर्ट

उन्हाळ्यात मस्त दिसण्यासाठी जीन्ससोबत लांब आणि सैल-फिटिंग शर्ट वापरून पाहू शकता. बॉलीवूड दिवामधे देखील आजकाल ही शैली खूप प्रसिध्द होत आहे. स्टायलिश दिसण्यायचे असेल तर हे नक्की करून पहा. आपल्या वॉर्डरोबमध्ये पांढऱ्या मोठ्या आकाराचा शर्ट ठेवलात तर ते खूप उपयुक्त ठरू शकते.

३. टी शर्ट ड्रेस

उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचे असेल तर टी-शर्ट ड्रेस जरूर ट्राय करा. दिवसाच्या पार्टीत किंवा मित्रांसोबत प्रवास करताना आपण हे घालू शकता. यासोबत, जर पांढरे शूज कॅरी केले तर लूक आणखी छान दिसेल.

४. डेनिम शॉर्ट्ससह पांढरा टी-शर्ट

उन्हाळ्यात पांढरा रंग उष्णतेची तीव्रता कमी करतो आणि त्वचेचे संरक्षण देखील करतो. म्हणूनच बाहेर जाण्यासाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये दोन किंवा तीन पांढरे टी-शर्ट असायला हवे. निळ्या जीन्स किंवा शॉर्ट्ससोबत अशी स्टाईल करा.

या कपड्यांचे तुमच्या वॉर्डरोबमधे समावेश करा आणि स्टायलिश दिसा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.