Fashion Tips : कमी उंचीच्या महिलांनी हे फूटवेअर घाला !

कमी उंचीच्या महिलांनी या फुटवेअर नक्की ट्राय करून पहा.
Fashion Tips : कमी उंचीच्या महिलांनी हे  फूटवेअर घाला !
Fashion tips in marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महिलांकडे अनेक प्रकारचे फूटवेअर असतात. नवीन ट्रेंडनुसार किंवा अगदी ऑफिस (Office), फंक्शन यांसाठी वेगवेगळे फूटवेअरची खरेदी केली जाते परंतु, कमी उंचीमुळे कोणत्या फूटवेअर घालावी हे त्यांना समजत नसते. अनेक वेळा विचार करून देखील त्यांची निवड चुकते. तसेच फॅशनसोबतच त्यांना त्यांच्या उंचीचे देखील भान राखावे लागते. उंची न वाढण्यामागे अनेक कारणे असतात पण त्याचे जितके फायदे असतात तितकेच नुकसानही.

हे देखील पहा -

कधीकधी काहींना त्यांच्या कमी उंचीमुळे अस्वस्थ वाटते. शाळा (School)-कॉलेज असो की, ऑफिससारख्या ठिकाणी खूप अवघडल्यासारखे वाटू लागते. कमी उंचीमुळे, काही स्त्रियांचा आत्मविश्वास कमी होतो आणि इतरांपेक्षा लहान दिसू नये म्हणून त्या विविध प्रकारचे चप्पल, शूजचा देखील वापर करतात. आज अशाच काही फुटवेअरबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही उंच आणि स्टायलिश दिसाल.

१. पीप टो हिल्स -

कमी उंची असलेल्या महिला पीप टो हिल्स वापरू शकतात. या चप्पलमुळे पाय लांब दिसतात तसेच पीप टो हिल्ससह विविध प्रकारचे सँडल बाजारात मिळतात. आपण आपल्या सोयीनुसार त्यांची निवड करू शकतो.

Fashion tips in marathi
Cleaning Tips : वॉश बेसिनमधले हट्टी डाग कसे काढाल

२. पंप सँडल -

आपल्याला हील्स घालायला आवडत असेल तर आपण ही सँडल नक्की ट्राय करू शकतो. या सँडल्स आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत. यामध्ये तुम्ही उठून दिसाल आणि आपली उंचीही दिसेल.

३. सिंपल फ्लँट सँडल -

बाजारात (Market) उपलब्ध असलेली ही सगळ्यात सिंपल फ्लँट अशी सँडल आहे, जी कोणत्याही आउटफिटसोबत सहज घालता येते.

४. पॉइंटेड फ्लॅट्स -

अनेकांना हील्स घालणे फारसे रुचत नाही. अशा महिलांनी पॉइंटेड फ्लॅट ट्राय करुन पहावे. हे सँडल फॉर्मल कपड्यांसोबतही छान दिसतात.

अशाप्रकारे आपण फूटवेअर ट्राय करुन आपली उंची वाढवू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.