वजन कमी करण्याची गोळी बाजारात लवकरच उपलब्ध होणार

डाएट, व्यायाम करूनही वजन कमी होत नसल्याने चिंता वाढत चालली आहे.
वजन कमी करण्याची गोळी बाजारात लवकरच उपलब्ध होणार
वजन कमी करण्याची गोळी बाजारात लवकरच उपलब्ध होणारGoogle

औरंगाबाद : वजन वाढल्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतोय. शिवाय वजन कमी करण्यासाठी नको ते फण्डे वापरावे लागतायत. डाएट, व्यायाम करूनही वजन कमी होत नसल्याने चिंता वाढत चालली आहे. पण आता त्यांना आनंदाची गोष्ट आहे, लवकरच वजन कमी करण्याची कोळी बाजारात उपलब्ध होणार आहे.

कोरोना काळात घरात राहिल्यामुळे वजन वाढलेल्याची आता अधिक चिंता वाढलीय. कारण वजन वाढल्यामुळे शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ झालीय. त्यामुळे आता आपलं वजन करण्यासाठी अनेकजण डॉक्टरांचा घेतायत, जिम जिममध्ये करतायत, मात्र चिंता कमी होत नाही. आता येत्या ४-५ महिन्यानंतर ही चिंता कमी होईल अशी शक्यता आहे, कारण भारतीय बाजारात लवकरच अशी गोळी उपलब्ध होणार आहे, जिच्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी मदत होईल. याबाबत, मधुमेह तज्ञ डॉ. मयुरा काळे यांनी माहिती दिली आहे.

तसं स्थूलता किंवा लठ्ठपणा हा सर्वांच्या शहरात राहणाऱ्या शिवाय ग्रामीण भागातील काहींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे आणि अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू होते. लॉकडाऊनच्या काळात घरातच राह्ल्याने काहींना काही सतत खाण्यात आले. याकाळात व्यायामही करता आला नाही आणि त्यामुळे वजन वाढलं. खूप बसून राहत असल्यामुळे वजनाची समस्या सातत्याने जाणवत आहे, आता हि समस्या घेऊन सध्या डॉक्टरांकडे अनेकजण येत आहेत. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता अनेकांना आहे, डॉक्टरांकडे अधिकाधिक लोक आता लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी एखादे इंजेक्शन गोळीची मागणी करतात, पण बाजारात सातत्यपूर्ण उपयोगी असणारे, अधिक परिणामकारक आणि कोणताही साईड इफेक्ट होणार नाही अशी गोळी उपलब्ध फारशी नाही. वजन कमी करण्यासाठी ही गोळी जगातल्या काही देशांमधील नागरिक घेत आहेत. रोज एक गोळी घेतल्यानंतर वजन वाढ्लेलय व्यक्तीला खायची इच्छा कमी होत असते आणि त्यातून वजन कमी होतं. असे डॉ. मयूरा काळे यांनी म्हटले आहे.

वजन कमी करण्याची गोळी बाजारात लवकरच उपलब्ध होणार
कोरोनामुळे रघुवीर घाटात पर्यटकांना बंदी

तसेच, ही नवी गोळी खाल्य्याने पोटाची हालचाल कमी होते आणि पोट भरल्यासारखं होते, त्यामुळे जेवण कमी जाते असा डॉक्टरांचा दावा आहे. ही गोळी कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करत असते. हि गोळी वापरण्यापूर्वी पाच ते सात हजार लोकांवर टेस्ट केल्यानंतर ही गोळी वापरण्यात आली आहे, त्यांचे वजनही कमी झाल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत गोळ्या किंवा औषधे खाल्ल्यामुळे वजन कमी जास्त व्हायचं पण ह्या नव्या गोळीमुळे वजन हे स्थिर राहण्यास मदत होणार आहे. ही गोळी येत्या तीन ते चार महिन्यात भारतात येण्याची शक्यता आहे, ही गोळी गेम चेंजर असणार आहे कारण पहिल्यांदा पेप्टाइड औषध गोळीच्या फॉर्ममध्ये मिळणार असल्याचेही यावेळी डॉ. मयूरा यांनी सांगितले.

सध्या या गोळीची किंमत अमेरिकेमध्ये बाराशे ते तेराशे रुपये आहे. भारतात त्याची किंमत 50 टक्के पेक्षा कमी असेल, म्हणजे ती गोळी ६०० ते ७०० रुपयाला मिळेल असा अंदाज आहे, मात्र किमतीची गोळी रोज परवडणारे आहे का? त्यामुळे त्याचाही विचार आता प्रत्येकाला करावा लागणार आहे. त्यामुळे गोळी खाण्यापेक्षा आपला आहार आणि व्यायाम यात सातत्य ठेवले तर वजन कमी करण्याचा कायमस्वरूपी मार्ग आपल्याला सापडू शकतो. मात्र, ज्यांना व्यायाम करणे शक्य नाही आणि आहारावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी लवकरच गोळीचा आधार मिळणार असल्याचे यावेळी डॉ. मयूरा यांनी यावेळी नमूद केले.

Edited By - Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com