Weight Loss Tips : झपाट्याने वजन कमी करायचे आहे ? रोज सकाळी प्या 'हे' ड्रिंक, आठवड्याभरात फरक दिसेल

कॅलरीज वाढण्याच्या प्रमाणात कॅलरीज बर्न न केल्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवते.
Weight Loss Tips
Weight Loss TipsSaam Tv

Weight Loss Tips : वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आजकाल लोक डाएटिंग आणि व्यायामावर जास्त भर देतात. मात्र, जंक फूडच्या सेवनामुळे त्यांना वजन कमी करण्यात यश मिळत नाही. याबाबत आरोग्य तज्ज्ञ सांगतात- जंक फूडमध्ये फॅट मुबलक प्रमाणात आढळते. जंक फूडच्या अतिसेवनामुळेही शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते. कॅलरीज वाढण्याच्या प्रमाणात कॅलरीज बर्न न केल्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवते.

यासाठी संतुलित आहार घ्या आणि रोज व्यायाम करा, जंक फूड टाळा. या नियमांचे पालन केल्याने तुम्ही नेहमी निरोगी राहू शकता. दुसरीकडे, जर तुम्हीही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल आणि वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर हे खास पेय रोज प्या. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. चला, जाणून घेऊया त्याबद्दल (Burn Belly Fat)

Weight Loss Tips
Weight Loss Tips : Messi सारखे फिट दिसायचे आहे ? आहारात समावेश करा 'या' पदार्थाचा

आले लवंगाचा चहा

आल्याला आयुर्वेदात औषध मानले जाते. आल्याचा वापर स्वयंपाकघरात चव वाढवण्यासाठी केला जातो. त्याच वेळी, आल्याचा वापर चहा आणि डेकोक्शनमध्ये देखील केला जातो. व्हिटॅमिन-ए, डी, आयर्न, झिंकसह अनेक आवश्यक पोषक घटक त्यात आढळतात.

Ginger Tea
Ginger TeaCanva

त्याचबरोबर लोह, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि हायड्रोक्लोरिक अॅसिड लवंगामध्ये आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी आरोग्य (Health) तज्ज्ञ वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आले-लवंगीचे पाणी पिण्याचा सल्ला देतात.

असे करा सेवन

  • यासाठी आले, लवंग आणि पुदिन्याची पाने दोन ग्लास पाण्यात नीट उकळून घ्या.

  • आता तुम्ही हे पेय सेवन करू शकता.

  • याशिवाय कोमट पाण्यात आले आणि लवंग पावडर मिसळून सेवन करा.

  • याच्या वापराने वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

  • वाढत्या साखरेवर (Sugar) नियंत्रण ठेवण्यासही हे पेय उपयुक्त ठरते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com