
Weight Loss Food Combination : चांगली डायटिंग करून सुद्धा तुमचे वजन वाढत चालले असेल. त्याचबरोबर लठ्ठपणाने देखील तुम्ही त्रासलेल्या असाल तर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यात थोडा बदल करावा लागेल.
तुमच्या डाएटमध्ये लागणाऱ्या या विचित्र गोष्टींच्या फूड कॉम्बिनेशनमुळे तुम्ही तुमचे वजन पटापट कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊ असे कोणते पाच फूड कॉम्बिनेशन आहेत. जेणेकरून वजन पटापट कमी होते.
1. एवोकाडो आणि डार्क चॉकलेट (Chocolate) :
तुम्हाला हे फूड (Food) कॉम्बिनेशन ऐकून विचित्र वाटले असेल. परंतु तुमच्या वेटलॉस जर्नी साठी हे फूड कॉम्बिनेशन अत्यंत फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक पिकलेले एवोकाडो आणि डार्क चॉकलेट घ्यायचा आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये एवोकाडो, एक चतुर्थांश कप कोको पावडर, आणि कमीत कमी अर्धा कप वितळलेले डार्क चॉकलेट घेऊन त्याचबरोबर चवीनुसार मध मिसळवून तुम्हाला रिफ्रेशिंग चॉकलेट मुस बनवायचे आहे.
2. अंड (Egg) आणि काळी मिरची :
अंड्यामध्ये उपलब्ध असणारा कोलाईन, हा मेटाबोलिझमला गती देतो. त्याचबरोबर काळी मिरी ही विटामिन सीने परिपूर्ण असते. यात असणारे पोषकतत्वे कोर्टीसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोनच्या विरोधात लढण्यासाठी बळ मिळते. हे एक हार्मोन आहे जे तुमच्या पोटाचा वसा निर्माणला बडावा देतो. काळी मिरी हे या हार्मोनला कमी करून पोटावरची चरबी वितळवण्यास मदत करते.
3. खजूर आणि पीनट बटर :
खजूरची गोड चव पीनट बटरच्या सॉल्टी टेस्टमध्ये मिसळवून आणखीन टेस्टी बनते. यासाठी खजूर चे दोन भाग करून प्रत्येक स्लाईसमध्ये पिनट बटर भरून लावा. या स्नॅक्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर उपलब्ध असते. सोबतच शेंगदाण्याचे बटर म्हणजेच पीनट बटर प्रोटीन भरपूर असते. त्याचबरोबर खजूर मिनरल्स सोबत कॅलरीजने सुद्धा भरपूर असते. म्हणून यांना एका वेळी थोड्या प्रमाणातच खा.
4. सफरचंद आणि पीनट बटर :
तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर सफरचंद आणि पीनट बटर दररोज खाल्ले पाहिजे. पीनट बटरमध्ये मोनोअनसेचुरेटेड आणि पॉलीअनसेंचुरेटेड फॅटी ऍसिड उपलब्ध असते. ज्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्याचबरोबर तुमचे वजन पटापट कमी होते. भरपूर प्रमाणात फायबर असलेल्या सफरचंदावर पीनट बटर लावून खा. दररोज हे खाल्ल्याने तुमच्या शरीराला पोषक तत्वे मिळतात. त्याचबरोबर तुमच्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.
5. रताळे आणि दही :
या फूड कॉम्बिनेशनला तयार करण्यासाठी सर्वात आधी एका वाटीमध्ये शिजवून घेतलेले रताळे घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करावे. ही स्नॅक्स डिश कार्ब आणि प्रोटीन इंटेक्स या दोघांवर देखील लक्ष ठेवते. दह्याची आंबट चव आणि रताळ्याची गोड चव हे हेल्दी स्नॅक्स खाण्यासाठी अतिशय चांगले लागते. त्याचबरोबर यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.