गरोदरपणात येणाऱ्या अशक्तपणामुळे बाळाच्या जन्मानंतर कोणत्या समस्या उद्भवतात

गरोदरपणात अशक्तपणा का येतो?
Pregnancy tips, Anemia during pregnancy, Food
Pregnancy tips, Anemia during pregnancy, Foodब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गरोदरपणात बाळाची व आईची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. या दरम्यान आईच्या खाण्यापिण्याची अधिक काळजी घ्यावी.

हे देखील पहा -

आईच्या आरोग्यवर बाळाचे आरोग्य निर्भय असते. आई जे काही पदार्थ खाते ते तिच्यातून बाळाला मिळत असतात. यादरम्यान सतत आपल्याला काही खाल्ले तरी उलट्या होतात व त्यामुळे अशक्तपणा येतो. शरीरात रक्ताची कमतरता कमी झाल्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. शरीरातील लाल रक्त पेशांना ऑक्सिजन गोळा करून संपूर्ण शरीरात वाहून नेण्यात अडचण येते आणि ते कमी असेल तर हा त्रास वाढतो. अशक्तपणा व त्यामुळे बाळावर कसा परिणाम होतो हे जाणून घ्या.

यादरम्यान अशक्तपणा का येतो ?

गरदोर महिलेच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सामान्यपेक्षा खूपच कमी होते त्यामुळे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचत नाही. शरीराला योग्य प्रमाणात पुरेसे लोह मिळत नाही की, अशक्तपणाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होते आणि रक्ताच्या या कमतरतेला अशक्तपणा म्हणतात.

Pregnancy tips, Anemia during pregnancy, Food
पुरुषांच्या केसांसाठीही ठरेल हे आयुर्वेदिक फळ फायदेशीर !

अशक्तपणाची लक्षणे

गरोदरपणात सतत थकवा जाणवणे, शरीर कमकुवत होते किंवा ऊर्जेची कमतरता होते. चालताना धाप लागणे, चक्कर येणे किंवा डोके दुखते. चिडचिड, पायात पेटके येणे, केस गळणे, भूक न लागणे ही काही साधी लक्षणे आहेत. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाळावर त्याचा परिणाम कसा होतो ?

पोटात असणाऱ्या बाळावर (Child) अशक्तपणाचा त्रास त्याच्या पातळीवर अवलंबून असतो. साधारणपणे आपल्याला शरीरातून मिळणारे लोह हे आधी बाळाला मिळते व त्यानंतर ते आपल्याला मिळते. जर बाळाला पुरेसे प्रमाणात लोह मिळाल्यास बाळावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. परंतु बाळाच्या मज्जासंस्थेच्या विकासासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी लोहाची नितांत गरज आहे, त्यामुळे लोहाची कमतरता कोणत्याही परिस्थितीत शरीरात होऊ देऊ नये. यादरम्यान डॉक्टर आपल्याला शरीरातील लोहाचे प्रमाण वाढावे यासाठी काही औषधे दिली जातात. यासाठी आपण शरीरात जीवनसत्त्व (Vitamins) क चे प्रमाण वाढवायला हवे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com