मुलांच्या उशीरा चालण्याचे नेमके कारण काय? जाणून घ्या त्यांच्या सवयी बद्दल

आपल्या मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला जगायची असते किंवा तो आनंद आपल्याला साजरा करायचा असतो.
मुलांच्या उशीरा चालण्याचे नेमके कारण काय? जाणून घ्या त्यांच्या सवयी बद्दल
Parenting tips, Child care ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला जगायची असते किंवा तो आनंद आपल्याला साजरा करायचा असतो. नवीन होणारे पालक आपल्या बाळाची आतुरतेने वाट पाहात असतात.

हे देखील पहा-

आपले बाळ जन्मल्यानंतर आपण त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी पासून ते त्याच्या कपड्यांपर्यंत सगळ्याच गोष्टींची विशेष काळजी घेत असतो. त्यातच जर आपल्या बाळाच्या काही गोष्टी ह्या उशिराने होत असतील तर पालक म्हणून आपण सतत चिंतेत असतो. आपल्याला मुलांच्या आरोग्याची आणि शारीरिक तंदुरुस्तीची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. मुलं जर उशिरा चालत असेल तर आपल्याला अधिक चिंता वाटू लागते. आपल्या मुलांचे उशिरा चालण्याचे नेमके कारण काय हे जाणून घ्या.

६ ते ८ महिन्यांची मुले उशिरा का चालतात

१. मुलांच्या उशीरा चालण्यामागे काही अंशी त्याचा आहार व वातावरणात होणारे बद्दलांमुळे देखील होत असतो. बहुतेक मुले ही उन्हाळ्यात चालू लागतात पण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात त्यांना चालताना त्रास होऊ लागतो. त्यामुळे ते चालणे टाळतात.

Parenting tips, Child care
सुदृढ बाळाचे दात येण्यास उशीर होत असला, तर घाबरू नका हे उपाय करा

२. नवजात मुले अनेकदा आजारी पडतात. त्यामुळे मुले अशक्त होतात आणि उशिराने चालायला लागतात. याशिवाय, कोणताही अनुवांशिक रोग देखील मुलांमध्ये उशिरा चालण्याचे कारण असू शकतो.

३. बऱ्याच घरात मुलांना नेहमी मांडीवर बसवले जाते. एकत्रित कुटुंबात (Family) मुल सतत कोणाच्या तरी अंगा-खांदयावर खेळत असते. त्यामुळे त्यांना चालण्याची संधी फाक कमी मिळते व ते उशिरा चालू लागतात.

४. ६ ते ८ महिन्यांच्या मुलांना चालायला शिकवताना त्यांच्या पायांकडे विशेष लक्ष द्या. त्यांना पाय पुढे टाकताना कोणता त्रास तर जाणवत नाही ना हे पहा. बऱ्याच वेळा मुले पाय हे वाकडे टाकतात व त्यांना तशीच सवय लागते त्यामुळे त्यांच्या पावलांकडे लक्ष द्यायला हवे.

५. मुलांना (Child) चालायला शिकवायचे असेल तर त्यांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मुलांच्या हात आणि पायांना रोज मसाज करा. यामुळे मुलाचे पाय मजबूत होतील आणि त्याचे शरीर भार सहज उचलू शकेल. तसेच, लहान मुलांना मसाज करताना डॉक्टरांच्या सल्ल्याने चांगले तेल वापरण्यास विसरू नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com