Viral Video : कॉफिन प्रँकमुळं लिफ्टमध्ये गेलेल्या महिलांसोबत काय घडलं? VIDEO बघून होईल संताप...

सोशल मीडियावर तुम्हाला एकापेक्षा एक मजेदार प्रँक व्हिडिओ पाहायला मिळतील.
Viral Video
Viral Video Saam Tv

Viral Video : सोशल मीडियावर तुम्हाला एकापेक्षा एक मजेदार प्रँक व्हिडिओ पाहायला मिळतील . त्यामुळेच आजकाल प्रँक्सचा ट्रेंड खूप वाढला आहे. मात्र, मौजमजेच्या वेळी काही लोक असे प्रँकही करू लागले आहेत, त्यामुळे लोकांचा जीव धोक्यात आला आहे. आता फक्त व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ (Video) पहा. यामध्ये काही खोडकर लोक शवपेटी (कॉफिन) घेऊन लिफ्टमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची (People) मस्ती करण्याचा प्रयत्न करतात , मात्र त्यानंतर लोकांचे काय होते ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

Viral Video
Viral Video : अबब ! केस कापण्यासाठी डोक्यावर बर्फाची लादी ठेवून सलूनमध्ये पोहोचला, पुढे जे घडलं...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सुरुवात लिफ्टने होते. ज्यामध्ये दोन महिला लिफ्टने वर जाताना दिसत आहेत. दरम्यान, तिघेजण एक मोठी शवपेटी (कॉफिन) घेऊन तेथे येतात आणि लिफ्टमध्ये ठेवून निघून जातात. ते त्या महिलेला सांगतात की ते काहीतरी विसरले आहेत आणि फ्यूनरल फ्लॉवर घेऊन येत असतानाच लिफ्टचा दरवाजा बंद होतो आणि लिफ्ट वर जायला सुरूवात होते. या दरम्यान महिला त्यांची मदत म्हणून लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण दरवाजा काही उघडत नाही आणि त्या शवपेटीमुळे (कॉफिन) लिफ्टमध्ये थोडे भीतीचे वातावरण तयार होते. त्यातूनच अचानक व्हिडिओमध्ये पुढच्याच क्षणात शवपेटीचे (कॉफिन) दार उघडते आणि मृतदेह (चौथा प्रँकस्टर) बाहेर येतो तेव्हा त्या महिला खूप घाबरलेल्या दिसतात. त्या मृतदेहाला (चौथा प्रँकस्टर) पाहून महिला घाबरून जोरजोरात ओरडू लागतात.

कॉफिन प्रँकचा व्हिडिओ येथे पहा -

हा प्रँक व्हिडिओ ट्विटरवर @LovePower_page या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शन दिले आहे, 'हॉट अ प्रँक'. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही यूजर्स संतापले आहेत. हे कोणत्याही अॅगलने मजेदार दिसत नाही. अशा प्रँक्समुळे लोकांना हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. त्याच वेळी, अनेकांना ते इतके मजेदार आढळले आहे की ते खूप हसतात.

Viral Video
VIRAL VIDEO : ही तर हद्दच झाली; डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत जोडप्याने काढले टॅटू; जीभेवरही...

एका यूजरने लिहिले आहे की, किमान महिलांच्या वयाची काळजी घेतली गेली असती. मला हा प्रँक अजिबात आवडला नाही. या कृत्यामुळे कुणाचा जीवही जाऊ शकतो. त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, हा हार्ट अटॅक प्रँक आहे भाऊ. हे कोणाशीही करू नका. दुसर्‍या युजरने लिहिले आहे की, पार्श्वभूमीतील अनावश्यक हसण्यामुळे डोकेदुखी होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com