What Is Beige Flag: बेज फ्लॅग म्हणजे काय? या व्हायरल डेटिंग ट्रेन्डची का होतेय एवढी चर्चा

Relationship tips: काळ पुढे जातोय तशा केवळ डेटिंगच्या अटीच नाही तर डेटिंगच्या पद्धतीही बदलत आहेत.
What Is Beige Flag
What Is Beige FlagSAAM TV

Dating Tips for Finding the Right Person: आपण बेज फ्लॅगविषयी ऐकलंच असेल? ही एक नवीन डेटिंग टर्म सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. सध्याची पीढी अतिशय फॉरवर्ड आणि प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या अटी देखील बदलत आहेत. काळ पुढे जातोय तशा केवळ डेटिंगच्या अटीच नाही तर डेटिंगच्या पद्धतीही बदलत आहेत.

हा बदल केवळ नव्या पीढीनेच स्विकारला नाही तर जुनी पीढी देखील तो स्विकारत आहे. रिलेशनशिपमध्ये बेज फ्लॅग (What Is Beige Flag) ही नवीन टर्म उदयास आली आहे. ही एक अतिशय अनोखी संकल्पना आहे. ही टर्म रेड प्लॅग आणि ग्रीन फ्लॅगच्या मधली आहे असा तुम्ही विचार करत असाला तर तुम्ही योग्य विचार करत आहात. हा फ्लॅग नेमका काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

What Is Beige Flag
World Food Safety Day 2023 : पालकांनो, मुले सतत जंकफूड खाताय? याप्रकारे लावा हेल्दी खाण्याची सवय

नातेसंबंधांमध्ये फ्लॅग अतिशय महत्वाचा आहे. यावरून तुम्ही तुमच्या नात्याचं भविष्य ठरवू शकता. त्यामुळे हे फ्लॅग आणि त्यांचा अर्थ जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. नात्यातील अटी पाहिल्या तर या फ्लॅगवरून लक्षात येते की तुमचं नातं खरंच पुढे नेण्यायोग्य आहे की ते आता संपवण्याची गरज आहे.

रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग यांबद्दल तुम्हाला माहिती असेलच. जेव्हा नातेसंबंधातील व्यक्ती विषारी बनू लागते ती असह्य होऊ लागते, तुम्हाला त्याची वागणूक तुमच्या योग्य वाटत नाही तेव्हा ते नातं रेड फ्लॅग दर्शवतं. अशावेळी तुम्हाला ते नातं पुढे नेण्यापासून टाळण्याची आवश्यकता असते.

त्याचप्रमाणे ग्रीन फ्लॅग या टर्ममध्ये तुमचा जोडीदार तुम्हाला एक परिपूर्ण सोलमेट वाटतो. तो तुमची काळीजी घेतो, तुमच्या आवडी-निवडीचा विचार करतो आणि तुम्ही त्याला त्याच्या आयुष्यात सर्व ठिकाणी हवे असता. आता यातली तिसरी आणि नवीन टर्म प्रचंड ट्रेंडमध्ये आहे.

बेज फ्लॅग म्हणजे काय?

बेज फ्लॅगचा नेमका अर्थ असा आहे की समोरची व्यक्ती नातेसंबंधात हवी तितके प्रयत्न करत नाहीत. उदाहरणार्थ केवळ डेट प्लॅन करण्यासाठी चित्रपटाची तिकिटे बुक करणेच गरजेचे नसते. तर डेटचे नियोजन करताना समोरच्या व्यक्तीची निवड काय आहे याचाही विचार करणे गरजेचे असते. एक प्रकारे बेज प्लॅग हा बोरिंग व्यक्तीला संबोधले जाऊ शकते. समोरची व्यक्ती एक चालती-फिरती बेज फ्लॅग असेल तर याचा अर्थ ती बोरिंग आहे आणि ती डेटिंगमध्ये हवं तेवढं लक्ष देऊ इच्छित नाही असा होऊ शकतो.

What Is Beige Flag
Garlic Chutney Recipe : लसणाची लाल चटणी महिनाभर टिकवायची आहे ? या सोप्या टिप्स फॉलो करा

बेज फ्लॅगचे काही उदाहरणं समजून घेऊया...

बायोकडे दुर्लक्ष

आजकाल अनेकजण डेटिंग अॅप्सचा वापर करतात. तुम्हीही एखाद्याचे डेटिंग प्रोफाइल स्कॅन करत असाल तर त्याने बायोमध्ये काय लिहिलं आहे यावरून तुम्ही त्याचा प्लॅग ओळखू शकतो. त्याच्या बायोमध्ये फक्त दोन-तीन शब्द लिहिले असेल आणि बायो लिहिण्यात त्याने फारसं लक्ष दिलं नसेल तर ती बोरिंग व्यक्ती आहे. तुम्ही त्याला बेज फ्लॅग म्हणू शकता.

अतिसामान्य सवयी

डेटिंग अॅपमध्ये समोरच्या व्यक्तीने त्याच्या हॉबीमध्ये कॉफी पिणे, झोपणे, नेटफ्लिक्स आणि चिल यांसारख्या सामान्य गोष्टी लिहिल्या असतील तर ते त्याचे छंद नाहीत, ती त्याची लाईफस्टाईल आहे. त्याने त्याच्या दिवसभरातील कामांचा यादी दिली आहे. हे बेज फ्लॅगचं एक उदाहरण मानलं जाऊ शकतं.

वेगळ्या आवडी निवडी नसणं

अनेकदा डेटिंग अॅप्समध्ये किंवा तुमच्या जोडीदारासोबतच्या चर्चेतून तुमचे आवडते टीव्ही शो, वेब सीरीज आणि चित्रपट कोणते आहेत? हा एक सामान्य प्रश्न विचारला जातो. यावर कोणी प्रसिद्ध मेनस्ट्रीम शोची नावे सांगितली तर समजून जा की त्याची मनोरंजानाची निवड खूपच सामान्य आहे आणि बोरिंग आहे.

डेटिंगबाबत निरस असणं

कुठेतरी बाहेर जायचं असेल तर तू ठरव, नवीन काही करायची इच्छा नाही, मला फक्त जुन्या ठिकाणी जायचं आहे. नेहमी असा विचार करणे की वेगळ्या प्रकारची डेट आखणे हे संकट आहे, हे बेज प्लॅगचं लक्षण आहे. या स्थितीत काही काळानंतर तुम्हालाही थोडे विचित्र वाटू शकते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com