Road Hypnosis : रोड हिप्नोसिस म्हणजे काय ? हा कसा होतो ? विनायक मेटेंचा मृत्यूला जबाबदार कोण?

रोड हिप्नोसिस म्हणजे काय ? तो कसा होतो ?
Road Hypnosis
Road HypnosisSaam Tv

Road Hypnosis : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, मराठा समाजासाच्या आरक्षणासाठी लढणारे नेते विनायक मेटे यांचा मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याचं सांगितलं गेलं. गाडीवरील ताबा सुटला आणि अपघातात विनायक मेटेंच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागला त्यामुळे त्यांचं जागीच निधन झालं.

त्याच्या मृत्यूचे कारण नेमके काय? हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडले परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेज मधून त्यांच्या अपघाताचे कारण असे सांगण्यात आले की, रोड हिप्नोसिसमुळे त्यांचा मृत्यू झाला.

परंतु, रोड हिप्नोसिस म्हणजे काय ? त्यामुळे अपघात कसा होतो? त्यात नेमके काय होते? त्यात आपला जीव जाऊ शकतो का ? जाणून घेऊया

Road Hypnosis
Home Remedies For Dry Cough : कोरडा खोकला झालाय ? वेळीच व्हा सावधान होऊ शकतो हा गंभीर आजार

रोड हिप्नोसिस म्हणजे काय ?

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर रोड संमोहन एक अशी परिस्थिती आहे. आपण ज्या ठिकाणी ड्रायव्हिंग करताना झोन आउट करतो आणि काय घडले याची स्पष्ट आठवण नसते.

१. मेंदूच संमोहन ही शारीरिक स्थिती आहे जी बहुतेक चालकांच्या लक्षात येत नाही.

२. रोड हिप्नोसिस साधारणपणे प्रवासाच्या अडीच तासांनी सुरु होतो. यात चालकाचे डोळे उघडे असतात पण, मेंदू विश्लेषण करत नाही.

३. रोड (Road) संमोहन हे वाहनाला मागील बाजूस अपघात होण्याचं पहिल कारण आहे.

४. रोड हिप्नोसिसमध्ये चालकाला टक्कर होईपर्यंत १५ मिनिटांत काहीही आठवत नाही.

५. किती वेगाने कार चालवतो आहे किंवा समोरच्या कारचा वेग किती आहे, याचा अंदाज चालकाला येत नाही.

६. लांब रस्त्यावर रोड संमोहनापूर्वी काही काळ चलचित्र बघितल्यासारखा भास होतो. जर आपल्याला शेवटच्या १५ मिनिटांत काही आठवत नसेल तर आपण मृत्यूच्या आहारी जात असू.

७. रोड संमोहन रात्रीच्या वेळी अधिक घडते. प्रवासी झोपलेला असल्यास परिस्थिती अधिक गंभीर होते.

प्रवास करताना काय काळजी घ्याल ?

- आपण प्रवास (Travel) करताना दर अडीच तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे.

- चालकांने प्रवासात विश्रांती घेणे किंवा थांबणे आवश्यक आहे.

- कंटाळवाणा प्रवास किंवा रिकामा रोड असल्यास यात चालकांचा मेंदू लवकर संमोहित होतो. त्यामुळे प्रवासात योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

- अनेक वेळा चालकाला पुरेशी झोप मिळत नाही, थकवा किंवा इतर काही कारणामुळे गाडी चालवल्याने मेंदू ऑटो पायलट मोडमध्ये जातो. यामुळे चालकाला आजूबाजूच्या परिस्थीतीचे भान राहत नाही व त्यामुळे अपघात होऊ शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com