Timing Of Fruit Juice : फळांचा रस सेवन करण्याची योग्य वेळ नेमकी कोणती, जाणून घ्या लक्षणे

Fruit Juice Timing : फळ खाणे आणि फळांचा ज्यूस पिणे, या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानल्या जातात.
Timing Of Fruit Juice
Timing Of Fruit JuiceSaam Tv

Healthy Fruit Juice : फळ खाणे आणि फळांचा ज्यूस पिणे, या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानल्या जातात. फळांमध्ये अनेक आजार दूर करण्यासाठीची शक्ती असते.

फळांमध्ये (Fruit) उपलब्ध असणारे पोषकतत्व तुम्हाला असलेला कोणताही आजार दूर करण्यासाठी मदत करतात. फळे खाणे तर ठीक आहे परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की फळांचा ज्यूस केव्हा आणि कधी प्यावा? नसेल तर जाणून घ्या.

Timing Of Fruit Juice
Lemon Juice Benefits : हेल्दी त्वचेपासून ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल लिंबाचा रस !

अनेक व्यक्ती वजन कमी करण्यासाठी पूर्णपणे लिक्विड डाइटवर (Diet) अवलंबून असतात आणि फ्रुटज्यूसचं सेवन करू लागतात. त्या व्यक्ती अन्नाचे ग्रहण करणे सोडून देतात. परंतु असे करणे अत्यंत चुकीचे आहे.

असं केल्याने तुम्ही कमजोर पडू शकता आणि भविष्यामध्ये मला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. फ्रुट ज्यूस तुमच्यासाठी तेव्हाच फायदेशीर ठरेल जेव्हा तुम्ही त्याचे सेवन योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात कराल.

Timing Of Fruit Juice
Amla Juice Benefits : रिकाम्या पोटी प्या आवळ्याचा रस, अनेक गंभीर समस्यांपासून होईल सुटका !

फ्रुट ज्यूस केव्हा प्यायचा नसतो -

सकाळी उठल्यानंतर ज्यूस पिण्यापासून वाचा -

सकाळी उठल्यानंतर फ्रुट ज्यूसचे सेवन कधीही करू नये. सकाळच्या वेळी तुमचे पोट आम्लिय असते. त्यामुळे जर तुम्ही फ्रुट ज्यूसचे सेवन करत असालt तर, तुमच्या शरीरामध्ये पॉयझन तयार होऊ शकते.

सोबतच तुमची पचनसंस्था बिघडते. फ्रुक्तोजमुळे तुमच्या लिव्हरवर वाईट परिणाम होतो. संत्री किंवा आंबट फळांचा ज्यूस सकाळी पिल्याने तुम्हाला ऍसिडिटी, डायजेशन निगडित समस्या उद्भवू शकतात.

जिम करण्याआधी -

अनेक व्यक्ती जीममध्ये जाण्याआधी फ्रुट ज्यूसचे सेवण करण्यास पसंत करतात. परंतु हे दीर्घकाळ टिकू शकत नाही. त्यामुळे तुमच्या पोटामध्ये एंठन येते आणि आतड्यांची समस्या उदभवते. तुम्ही वर्कआउट करण्याच्या एक तास आधी फ्रुट ज्यूस पिऊ शकता.

झोपण्याआधी -

रात्री झोपण्याआधी फळांच्या रसाचे सेवन करणे चुकीचे आहे. खास करून जर तुम्ही वजन कमी करत असाल तर, रात्री झोपताना फळांचा रस पिल्याने तुमचे वजन वाढण्याच्या वाटचालीकडे जाऊ शकते. झोपण्याआधी फ्रूट ज्यूस पिल्याने सूज आणि जळजळची समस्या होऊ शकते.

डायबिटीज -

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी फळांचा रस पिणे अत्यंत चुकीचे आहे. कशातच मधुमेह असलेल्या व्यक्तींना हाय फायबर युक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. ती सुद्धा मधुमेह रोग्यांनी फळांच्या रसाचे सेवन करणे टाळले पाहिजे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com