World Telecommunication Day 2023 : जागतिक दूरसंचार दिवसाचे काय आहे महत्व, इतिहास आणि थीम? जाणून घ्या

World Telecommunication Day : डिजिटल युगात संवादाची अनेक साधने उपलब्ध आहेत.
World Telecommunication Day 2023
World Telecommunication Day 2023Saam Tv

World Telecommunication Day : पृथ्वीवरील जीवन जगण्यासाठी दळणवळण नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. एखादी व्यक्ती आपले विचार, कल्पना, मतं आणि इच्छा व्यक्त करण्यासाठी विविध संवाद साधने वापरते. डिजिटल युगात संवादाची अनेक साधने उपलब्ध आहेत. केवळ वास्तविकच नाही तर आभासी जगातूनही आपल्याला आपले म्हणणे इतरांपर्यंत पोहोचवण्यास मोठी मदत मिळते.

दरवर्षी 17 मे हा जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन म्हणून साजरा (Celebrate) केला जातो. आज आपण या वर्षीच्या जागतिक दूरसंचार दिनाचा इतिहास, महत्त्व आणि थीम याविषयी जाणून घेऊया. जागतिक दूरसंचार दिन का साजरा केला जातो?

World Telecommunication Day 2023
International Family Day 2023 : 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन' का साजरा केला जातो ? जाणून घ्या इतिहास व महत्त्व

इंटरनेट आणि संपर्काच्या इतर माध्यमांचा समाजावर भरपूर प्रभाव आहे. या व्यापक परिणामाच्या जागृतीसाठी, जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन दरवर्षी साजरा केला जातो. आजही जगभरात असे अनेक देश आहेत जिथे लोकांना (People) एकमेकांशी जोडण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. दळणवळणातील अडथळे दूर करण्यासाठीच इंटरनॅशनल कम्युनिकेशन असोसिएशनची स्थापना महत्त्वाची मानली जाते.

इतिहास

जागतिक दूरसंचार दिनाचा इतिहास पाहिला तर 1969 पासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. वास्तविक, 17 मे हा दिवस ठरवण्यात आला कारण या दिवशी 1865 मध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली.

आयटीयूचे मूळ नाव पूर्वी इंटरनॅशनल (International) टेलिग्राफ युनियन होते. ITU ची स्थापना पॅरिसमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ अधिवेशनावर स्वाक्षरी करून झाली. सन 1932 मध्ये, त्याचे नाव बदलून इंटरनॅशनल कम्युनिकेशन असोसिएशन करण्यात आले, तर 1947 मध्ये, या संघटनेला संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था म्हणून नवीन ओळख देण्यात आली.

World Telecommunication Day 2023
National Dengue Day : डेंग्यूचा ताप अधिक घातक कधी होतो ? या लक्षणांना चुकूनही करु नका दुर्लक्ष

मार्च 2006 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली (UNGA) द्वारे 17 मे ही तारीख जागतिक माहिती समाज दिन म्हणूनही घोषित करण्यात आली. यासह, 17 मे ही तारीख जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन म्हणून पाळली जाते.

कमी विकसित देशांमध्ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक दूरसंचार दिनानिमित्त, ITU खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांना 'Partner2Connect' डिजिटल अलायन्सद्वारे चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी वचनबद्ध होण्याचे आवाहन करते.

World Telecommunication Day 2023
Mother's Day दिवशी हाेणार गर्भपात, गाेपनीय Mail आला पण त्यापुर्वीच..., डाॅक्टरसह तिघांवर गुन्हा दाखल

या वर्षाची थीम

या वर्षी जागतिक दूरसंचार दिनाची थीम 'माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाद्वारे सर्वात कमी विकसित देशांना सक्षम बनवणे' आहे.

नवीन पोर्टल

केंद्र सरकारने नवीन पोर्टल सुरू केले आहे या पोर्टलच्या मदतीने तुमचा हरवलेला फोन सहज सापडेल यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच लोकांचे हरवलेले फोन आणि वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवण्याचा एक प्रभावी मार्ग शोधला आहे.

संचार सारथी

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'संचार सारथी' पोर्टल सुरू केले आहे. 17 मे म्हणजे उद्यापासून 'जागतिक दूरसंचार दिनानिमित्त' हे पोर्टल लोकांसाठी लाईव्ह असेल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

World Telecommunication Day 2023
Tech Tips : सावधान! नजर हटी, दुर्घटना घटी Bluetooth, WIFI, Airdrop तासंतास चालू ठेवू नका नाहीतर...

चोरीला गेलेला मोबाईल वापरणे सोपे जाणार नाही

रेल्वे आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 16 मे रोजी संचार सारथी पोर्टल लाँच केले. या पोर्टलद्वारे तुम्ही तुमचा हरवलेला मोबाईल नंबर ब्लॉक आणि अनब्लॉक करू शकता. अशा परिस्थितीत आता चोरीला गेलेला मोबाईल वापरणे सोपे जाणार नाही. या पोर्टलवर तुम्ही हरवलेल्या मोबाईलची तक्रार सहज नोंदवू शकाल. 

यासोबतच त्याचा आता माग काढण्यासही मदत होणार आहे. संचार साथी पोर्टलवर माहितीची नोंदणी केल्यानंतर मोबाईल ऑपरेटरला चोरीला गेलेल्या मोबाईलची माहिती मिळेल. त्यानंतर तो मोबाईल अपडेट झाल्याची बातमी आल्यानंतर तो सुरू करण्यात येईल. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला एका आयडीवर किती सिमकार्ड जारी केले आहेत हे देखील कळेल.

चोरीला गेलेला मोबाईल कसा ब्लॉक करायचा?

  • जर तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल आणि तुम्हाला त्याचा गैरवापर टाळण्यासाठी ब्लॉक करायचा असेल तर https://sancharsaathi.gov.in/ वर क्लिक करा.

  • यामध्ये नागरिक केंद्रित सेवा निवडा.

  • येथे तुम्हाला Block Your Lost/Stolen Mobile चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • हा पर्याय निवडल्यानंतरच तुमच्या समोर एक पेज ओपन होईल जिथे तुम्हाला मोबाईलशी संबंधित माहिती द्यावी लागेल.

  • तुम्हाला दोन्ही मोबाईल नंबर, दोन्ही 15 अंकी IMEI क्रमांक प्रविष्ट करावे लागतील.

  • यासोबतच तुम्हाला डिव्हाईस मॉडेल आणि मोबाईल इनव्हॉइस देखील अपलोड करावे लागतील.

  • त्यानंतर मोबाईल हरवल्याची तारीख, वेळ, जिल्हा आणि राज्याची माहितीही भरावी लागेल.

  • यासोबतच तुम्हाला पोलिसांकडे नोंदवलेला तक्रार क्रमांक, पोलिस स्टेशनचे ठिकाण, राज्य आणि जिल्ह्याचे नाव देखील टाकावे लागेल.

  • पोलिस तक्रारीची प्रत येथे अपलोड करा.

  • नंतर तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, पत्ता, ईमेल प्रविष्ट करा.

  • शेवटी डिस्क्लेमर निवडा आणि फॉर्म सबमिट करा.

  • हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा फोन ब्लॉक केला जाईल.

  • याद्वारे तुम्ही फोन ट्रॅकही करू शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com