
आज २१ सप्टेंबर आतरराष्ट्रीय शांतता दिनी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. मानवतेला, मानवी मुल्यांना वाचवण्यासाठी आणि जगभरात शांतता नांदावी यासाठी जागतिक शांतता दिवस साजरा केला जातो. २१ सप्टेंबर १९८१ रोजी पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे हा दिवस साजरा केला गेला होता. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. (What is the significance of International Day of Peace? Find out ...)
हे देखील पहा -
जगातील सर्व देशांमध्ये आणि लोकांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, जगातील माणसं आनंदी आणि गुण्यागोविंदानं सुखी राहावे यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने १९८१ साली 'लोकांच्या शांतीचा हक्क' हा विषय घेऊन पहिल्यांदा जागतिक शांतात दिवस साजरा केला होता. प्रत्येक वर्षी २१ सप्टेंबरला शांतता दिवस साजरा करण्यासाठी एक स्पेशल थीम असते. २०१९ मध्ये ‘क्लायमेट अॅक्शन फॉर पीस’ ही थीम होती. तर यंदाच्या २०२१ या वर्षी (Recovering better for an equitable and sustainable world)
आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा जगभरातील शाळा, महाविद्यालयं आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. भारतात आजच्या दिवशी पांढऱ्या कबुतरांना आकाशात मुक्त करण्यात येतं. पांढरी कबुतरं ही शांतीचे प्रतिक मानण्यात येतात. जगभरात शांतीचा संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे साहित्य, संगीत, चित्रपट आणि खेळाच्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.