
Maghi Ganpati Special : माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला तिलकुंड चतुर्थी व्रत केले जाते. याला विनायकी चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात. यावेळी हे व्रत 25 जानेवारी, बुधवारी आहे.
दानाचे महत्त्व -
माघ महिन्यामुळे या चतुर्थी तिथीला दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गणपतीला तीळ अर्पण केले जातात. त्यानंतर ते प्रसाद म्हणून वाटले जातात. याशिवाय गरजू लोकांना लोकरीचे कपडे, ब्लँकेट आणि जेवन दिले जाते. दुसरीकडे तिळापासून बनवलेल्या अन्नपदार्थांचे दान केल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात.
व्रत व उपासना पद्धत -
तिळकुंड चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.
यानंतर आसनावर बसून श्री गणेशाची पूजा करावी.
पूजेच्या वेळी श्री गणेशाला धूप-दीप दाखवा.
फळे, फुले, तांदूळ, रोळी, मोळी, पंचामृताने आंघोळ करून तीळ किंवा तिळ-गुळाच्या वस्तू आणि लाडू अर्पण करा.
श्रीगणेशाची पूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवावे.
पूजेनंतर ‘ओम श्रीगणेशाय नमः’ चा 108 वेळा जप करावा.
सायंकाळी कथा ऐकल्यानंतर गणेशजींची आरती करावी.
या दिवशी उबदार कपडे, ब्लँकेट, कपडे आणि तीळ दान करा.
अशाप्रकारे श्री गणेशाची पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी सतत वाढते.
काय आहे श्रद्धा -
असे मानले जाते की या चतुर्थीला व्रत ठेऊन श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व दुःख दूर होतात, मनोकामनाही पूर्ण होतात. या दिवशी तीळ दान करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी गणेशाला तीळ अर्पण केले जातात. म्हणूनच याला तिलकुंड चतुर्थी म्हणतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.