Heart Block : हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यावर काय करायला हवे? जाणून घ्या

Heart Health : हल्ली हृदयविकार हा सामान्य आजार झाला आहे, याचे कारण म्हणजे अनियमित जीवनशैली आणि तेलयुक्त अन्नपदार्थ.
Heart Block
Heart BlockSaam Tv

Blockage In Heart : हल्ली हृदयविकार हा सामान्य आजार झाला आहे, याचे कारण म्हणजे अनियमित जीवनशैली आणि तेलयुक्त अन्नपदार्थ. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो आणि त्यामुळे ट्रीपल वेस्लस डिसीज होण्याची शक्यताही असते. म्हणून वेळीच योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

हृदयविकाराचा झटका का येतो?

हृदयाद्वारे संपूर्ण शरीरात रक्त पुरवठा केला जातो. हृदयाकडे रक्त (Blood) परत धमन्यांद्वारे येते. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल लेव्हल वाढल्याने येथे चरबी जमा होते. परिणामी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. याला ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’ म्हणतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

Heart Block
Symptoms Of Heart Block : थकवा येतोय, ही ५ लक्षणे दिसताहेत; वेळीच सावध व्हा, अन्यथा...

ट्रिपल वेसल डिसीज’ म्हणजे काय?

‘कोरोनरी आर्टरी डिसीज (Disease)’ हवंअतिशय धोकादायक प्रकार आहे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. प्रमुख 3 धमन्यांद्वारे हृदयापर्यंत रक्त पोहोचवण्याचे काम केले जाते आणि जेव्हा या तीनही धमन्या ब्लॉक होतात तेव्हा त्याला ‘ट्रिपल वेसल डिसीज’ असे म्हणतात. ज्यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे या समस्या उद्भवतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

अँजिओप्लास्टी म्हणजे काय?

अँजिओप्लास्टी ट्रिपल वेसल डिसीजवर एक हृदय शस्त्रक्रिया आहे, त्याला बलून अँजिओप्लास्टी (Balloon Angioplasty) आणि पर्क्यूटेनियस ट्रान्सल्युमिनल अँजिओप्लास्टी (PTA) देखील म्हणतात. यामध्ये रक्तवाहिन्यांद्वारे होणारा रक्तपुरवठा सुरळीत केला जातो.

Heart Block
Heart Attack Symptoms : हृदयविकाराची 'ही' 5 चिन्हे वेळीच ओळखा, अन्यथा...

ट्रीपल वेस्लस डिसीजपासून बचाव करण्यासाठी उपाय -

  • तेलकट अन्नपदार्थ खाणे टाळा

  • आरोग्यदायी आहार घ्या

  • तणावग्रस्त राहू नका

  • नियमित व्यायम करा

  • वाढते वजन कमी करा

  • मद्यपान करू नका

  • ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवा

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com