Monsoon tips : पावसाळ्यात या वस्तू पाण्यात भिजल्यानंतर करा हे काम

पावसाळ्यात वस्तू भिजल्यानंतर त्याची काळजी कशी घ्याल
Monsoon tips and tricks, Monsoon care
Monsoon tips and tricks, Monsoon careब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पावसाळा सुरू झाला की, आपण आपल्या वस्तूंची अधिक काळजी घेत असतो. त्या भिजू नये म्हणून त्याला प्लास्टिक किंवा कॅरी बॅगमध्ये सेफ ठेवत असतो.

हे देखील पहा -

पावसाळा हा खूप आल्हाददायक असतो, पण त्याच वेळी सगळ्यांना त्रास देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे या ऋतूत आपल्या वस्तू खूप ओल्या होतात. फोन पाण्यात भिजलेला, लॅपटॉप पाण्यात भिजलेला, कपडे भिजलेले इ. पण या सर्व गोष्टींबद्दल तुम्ही काय करू शकता? अधिक पाऊस असल्यावर आपल्याला बॅगेत इलेक्ट्रॉनिक वस्तूसोबत घेऊन जाण्याची अधिक भीती वाटते. पावसाळ्यात मोबाइल फोन, लॅपटॉप भिजल्यानंतर अशावेळी काय करावे हे आपल्याला सुचत नाही. बॅग, शूज, पॉकेट यांसारख्या वस्तू भिजल्यानंतर काय करावे हे जाणून घेऊया

१. जर फोन (Phone) पाण्यात भिजला तर तो लगेच काम करणे बंद करतो, मग तो आधी कोरड्या तांदळाच्या ढिगाऱ्यात ठेवा. हे आपल्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. कच्चा तांदूळ लवकर ओलावा शोषून घेण्यास मदत करते.

२. लॅपटॉप पाण्यात भिजला तर आपण तो टिश्यूने पूर्णपणे पुसून घ्यावा. त्यानंतर तो कच्च्या तांदळात ठेवावा. कच्च्या तांदळाने ते पूर्णपणे झाकून ठेवावे लागेल.

Monsoon tips and tricks, Monsoon care
Kitchen hacks : कडू कारल्याचे सालटे फेकू नका, दूर होतील अनेक समस्या

३. शूजला पाण्यामुळे वास येऊ लागला असेल, तर आपल्याला शूजमध्ये सिलिका जेलचे पाकीट घालायचे आहेत. याशिवाय शूज हवेत वाळवल्यानंतर त्यात टॅल्कम पावडरही घालू शकता.

४. चामड्याला पाण्यापासून दूर ठेवणे फार महत्वाचे आहे आणि जर ते पाण्यात भिजले असेल तर आपण ते प्रथम कागदाच्या टिश्यूने पुसून टाकावे आणि नंतर ते कोरडे करण्यासाठी हवेशीर ठिकाणी ठेवावे.

५. शूजप्रमाणे, सिलिका जेल पॅक देखील वॉलेटसाठी वापरले जाऊ शकतात. याशिवाय आपण वॉलेट रिकामे करून हवेत वाळवण्याचा प्रयत्न करता कारण बरेच लोक लेदरचे पाकीट वापरतात आणि जर ते नीट वाळवले नाही तर त्यातून वास येऊ लागतो.

६. पावसात (Monsoon) कपडे वारंवार भिजत असतील आणि ते पुरेसे कोरडे नसतील तर त्यांना दुर्गंधी येत असेल तर पाण्यात हायड्रोजन पेरॉक्साईड मिसळून फवारणी करावी आणि नंतर हवेत वाळवावी. अशाप्रकारे, तुमचे कपडे वासापासून बर्‍याच प्रमाणात दूर होतील.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com