Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय दान करावे? जाणून घ्या...

Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीया ३ मे २०२२ या दिवशी आली आहे. या दिवशी सुरु केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ हे अक्षय असते.
What to donate on Akshaya Tritiya Day Find out
What to donate on Akshaya Tritiya Day Find outSaam Tv

Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा दिवस असून साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवसाला अखाती तीज म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी शुभ कार्य करण्यास विशेष प्राधान्य असते. गृहप्रवेश, विवाह समारंभ, नवीन घराची तसेच नवीन वाहनांची खरेदी या दिवशी केली जाते. हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येतो. यंदा ही अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2022) ३ मे २०२२ या दिवशी आली आहे. या दिवशी सुरु केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ हे अक्षय असते. (What to donate on Akshaya Tritiya Day Find out)

हे देखील पाहा -

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

पुराण काळापासून अक्षय्य तृतीयाचे वेगवेगळे महत्त्व सांगितले. या दिवशी देवाची पूजा-अर्चना आणि पितरांचे पूजन केले जाते. असे म्हटले जाते की, भगवान विष्णूने या दिवशी पृथ्वी तलवार सहाव्यांदा अवतार घेतला होता. म्हणून याच दिवशी परशुराम जयंती (Parshuram Jayanti) साजरी केली. परशुराम हा भगवान विष्णूचा एक अवतार आहे अशी मान्यता आहे.

या दिवशी काय केले जाते?

या दिवशी मातीच्या घागरात पाणी भरून वाळा टाकतात. त्यावर डांगर हे फळ ठेवून या घागराची पूजा करतात. याला 'घागर पुजणे' असे देखील म्हटले जाते. तसेच नैवैदेच्या ताटात खीर-पुरणाची पोळी, आमरस किंवा आंब्याची फोडी, कटाची आमटी, पापड - कुरडई आदी पदार्थाचा विशेष समावेश असतो. या दिवशी ब्राम्हणाला दान देखील दिले जाते. वर्षभरात आपल्या घरात कोणी मृत झाले असेल तर त्याच्या नावाने 'डेरगं' भरतात.

What to donate on Akshaya Tritiya Day Find out
World Asthma Day 2022: दम्याचा त्रास होत असेल तर 'ही' काळजी घ्या...

दान काय करावे ?

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने-दागिन्यांची (Gold And Silver) खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. चांदीलाही विशेष महत्त्व असते. या दिवशी तांब्याची आणि पितळाच्या भांड्यांची देखील खरेदी केली जाते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्याने घरात सुखसमृद्धी येते, धनलाभ होतो. तसेच दान केल्याने पुण्य लाभते. हिंदू कालगणनेमध्ये हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी आपल्या इच्छेनुसार पाण्याचे मडके, जवस, धान्य आणि वस्त्र दान दिले जाते. इलेक्ट्रॉनिक वस्तुंना या दिवशी विशेष महत्त्व असते.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com