Whatsapp Feature : व्हॉट्सअॅपचे ५ भन्नाट फीचर्स! तुम्ही कधी वापरलेत का?

Whatsapp Updated Features : व्हॉट्सअॅप नेहमी नवनवीन फिचर्स उपलब्ध करत असतो.
Whatsapp Feature
Whatsapp FeatureSaam Tv

Whatsapp Top 5 Features 2023

सध्या जग डिजिटल झाले आहे. डिजिटल युगात इंटरनेटच्या माध्यमातून लोक एकमेकांशी जोडले गेले आहे. यात व्हॉट्सअॅप महत्त्वाचे काम करते. माणसांना जोडण्याचा महत्त्वाचा दुवा म्हणजे व्हॉट्सअॅप. व्हॉट्सअॅप नेहमी नवनवीन फिचर्स उपलब्ध करत असतो.

व्हॉट्सअॅपचे जवळपास २ अब्जाहून अधिक युजर्स आहेत. चॅटिंग, फोटो किंवा व्हिडिओ कॉल, व्हॉईस कॉल करण्यासाठी सर्वात आधी व्हॉट्सअॅपला प्राधान्य देतात. युजर्सला वापरासाठी जास्त सोपे जावे यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये बरेच अपडेट होत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ अपडेटबद्दल सांगणार आहोत.

Whatsapp Feature
Husband Wife Relationship :जोडीदाराशी पटत नाहीये? या टिप्स फॉलो करा नाते होईल अजून घट्ट

1. सुरक्षित खासगी चॅट्स

व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी चॅट लॉकचे अपडेट केले होते. यामध्ये आपण काही चॅट्स खासगी लॉक करु शकतो. त्यानंतर त्याला अॅक्सेस करु शकतात. यामुळे प्रायव्हेट चॅट सुरक्षित राहतात.

2. एचडी क्वालिटी फोटो

मेटा ने व्हॉट्सअॅपमध्ये एचडी फोटो पाठवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आपण पाठवलेले फोटो हाय क्वालिटीमध्ये दिसतात. कंपनी लवकरच एचडी व्हिडिओ पाठवण्यासाठी परवानगी देणार आहे.

Whatsapp Feature
Kid's Smartwatch 2023: मुलगा कुठे आहे याची अप-टू-डेट मिळेल माहिती, हे 5 स्मार्टवॉच आहेत बेस्ट पर्याय

3. इन्सटंट व्हिडिओ मेसेज

व्हॉट्सअॅपने नवीन फिचर लॉंच केले आहे. त्यात आपण व्हॉट्सअॅपच्या मेसेजचा रिप्लाय एका छोट्या व्हिडिओने देऊ शकतो. छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधू शकता. व्हिडिओद्वारे प्रतिसाद देण्याची परवानगी व्हॉट्सअॅपने दिली आहे.

4. अज्ञात कॉलरला म्यूट करा

जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर अज्ञात व्यक्तीचे कॉल येत असतील. त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला म्यूट करु शकता. त्यामुळे त्या नंबरवर येणारे कॉल डायरेक्ट म्यूट होतील आणि त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही.

5. मेसेज एडिट करा

जर तुम्ही मेसेज पाठवताना तुमची काही चूक झाली असेल तर तुम्ही ती चूक एडिट करु शकता. तुम्ही केवळ १५ मिनिटांतच हा मेसेज एडिट करु शकता. जर तुम्ही मेसेज एडिट केला तर त्याची माहिती समोरच्या व्यक्तीला कळते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com