WhatsApp ने भारतात बॅन केले तब्बल १९ लाखांहून अधिक अकाउंट्स; जाणून घ्या कारण...

व्हाट्सअॅपने मे महिन्यात १९ लाखांहून अधिक भारतीय अकाउंट बॅन करण्यात आले आहेत. व्हाट्सअॅपने (Whatsapp) प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे.
Whatsapp
Whatsapp saam tv

नवी दिल्ली : व्हाट्सअॅपने मे महिन्यात १९ लाखांहून अधिक भारतीय अकाउंट बॅन करण्यात आले आहेत. व्हाट्सअॅपने (Whatsapp) प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे. नवे आयटी नियम,२०२१ अंतर्गत व्हाट्सअॅपने ही कारवाई केली आहे. व्हाट्सअॅपने याआधीही अशी कारवाई केली आहे. ( Whatsapp Account Ban News In Marathi )

Whatsapp
तुमच्याकडे असलेली ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? RBI ने दिली महत्वाची माहिती

गेल्या काही वर्षांपासून व्हाट्सअॅपने आर्टिफिशिअल इंटेलीजेंस आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याचे सांगितलं होतं. तसेच व्हाट्सअॅपचे डेटा सायंटिस्ट्स आणि तज्ज्ञांकडून अॅप सुरक्षित करण्यासाठी सातत्याने काम करण्यात येत आहे. नव्या आयटी नियमानुसार, पन्नास लाखांहून अधिक अकाउंट असणाऱ्या डिजिटल (Digital) प्लॅटफोर्मला दर महिन्याला अनुपालन अहवाल सादर करावा लागतो. तसेच वापरकर्त्यांकडून मिळालेल्या तक्रारींची माहिती द्यावी लागते.

का बॅन करण्यात आले अकाउंट ?

कंपनीच्या माहितीनुसार, गैर कायदेशीर, अश्लील, अपमानकारक, धमकी देणारे, घाबरवणारे मजकूर, समाजात द्वेष निर्माण करणारे मजकूर पसरवणाऱ्यांचे व्हाट्सअॅप अकाउंट बॅन करण्यात आले आहेत. तसेच कंपनीच्या अटी-शर्थीचे उल्लंघन करणाऱ्यांचे अकाउंटवर कारवाई करण्यात आली आहे.

Whatsapp
WhatsApp वर बॅन केलंय ? घाबरु नका, 'या' फिचरमुळं होणार रिस्टोर

व्हाट्सअॅपने केले होते १८ लाख खाते बॅन

दरम्यान, याआधीही व्हाट्सअॅपने १६.६ लाख भारतीयांचे व्हाट्अॅपचे अकाउंट बॅन केले होते. कंपनीला मे महिन्यात ५२८ ग्रीवांस रिपोर्ट मिळाला होता. त्यावरून २४ प्रकरणात कारवाई केली होती. एप्रिल महिन्यात ८४४ ग्रीवांस रिपोर्ट मिळाला होता. त्यावरून १२३ प्रकरणात कारवाई केली होती. व्हाट्सअॅपने याआधी १८ लाख व्हाट्सअॅप बॅन केले होते. तर मार्च महिन्यात ५९७ ग्रीवांस रिपोर्ट मिळाला होता. त्यावरून ७४ प्रकरणात कारवाई केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com