Whatsapp कडून Android यूजर्सना सावधानतेचा इशारा; प्रायव्हेसी येऊ शकते धोक्यात!

Whatsapp Latest News : विल कॅथकार्टने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कंपनीच्या सिक्युरिटी रिसर्च टीमला काही बनावट अॅप्स सापडले आहेत, जे व्हॉट्सअॅपसारखी सर्विस देतात.
WhatsApp New  feature
WhatsApp New feature Saam Tv

मुंबई: जगातील सर्वात लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने (Whatsapp) अँड्रॉइड यूजर्सना सावधानतेचा इशारा दिला आहे. गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅपसारखेच दिसणारे अनेक फेक अॅप्स आहेत. या अॅप्समुळे यूजर्सचा डेटा चोरी होऊन प्रायव्हेसी धोक्यात येऊ शकते, त्यामुळे अशा खोट्या अॅप्सपासून दूर राहावे आणि ते डाऊनलोड करु नये तसेच वापरुही नये असा इशारा कंपनीद्वारे वापरकर्त्यांना दिला आहे. (Whatsapp Latest News)

हे देखील पाहा -

व्हॉट्सअॅपचे हेड (प्रमुख) विल कॅथकार्ट (Will Cathcart) यांनी याबाबत ट्विट करत हा इशारा दिला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जे वापरकर्ते फेक अॅप वापरत आहेत, ते मोठ्या अडचणीत येऊ शकतात. जवळपास दोन अब्ज (200 दशलक्ष) सक्रिय वापरकर्ते असलेले WhatsApp हे सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग मोबाईल अॅप्लिकेशन्सपैकी एक आहे. याचा गैरफायदा स्कॅमर्स घेतात त्यामुळे त्यांच्यासाठीही हे एक लोकप्रिय व्यासपीठ आहे, जेथे ते विविध तंत्रांद्वारे वापरकर्त्यांना आकर्षित करतात.

विल कॅथकार्टने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कंपनीच्या सिक्युरिटी रिसर्च टीमला काही बनावट अॅप्स सापडले आहेत, जे व्हॉट्सअॅपसारखी सर्विस देतात आणि त्यांचा लोगोही काहीसा तसाच आहे. "अलीकडेच आमच्या सिक्युरिटी रिसर्च टीमला गुगल प्ले स्टोअवर (Google Play) HeyMods नावाच्या डेव्हलपरचे काही अॅप्स सापडले आहेत. या अॅप्समध्ये अनेक मालवेअर्स लपल्याचे आढळले, ज्यात Hey WhatsApp आणि इतर अनेक अॅप्स समाविष्ट आहेत," असं त्यांनी ट्विट केलं आहे.

WhatsApp New  feature
हुश्शsss...२२२ प्रवासी बचावले; हवेतच विमानात बिघाड, कोचीत इमर्जन्सी लँडिंग

कॅथकार्ट पुढे म्हणाले, "या अॅप्सने नवीन फीचर्स देण्याचं आमिष दिलं होतं, परंतु लोकांच्या फोनमध्ये स्टोअर असलेली वैयक्तिक माहिती आणि डेटा चोरण्यासाठी तो एक घोटाळा होता. आम्ही ही माहिती गुगलसोबत (Google) शेअर केली आहे आणि आम्ही या अॅप्सचा सामना कसा करायचा यावर काम करत आहोत." गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅपसारखे फेक अॅप्स हटवले जातात, परंतु यूजर्स हे अॅप्स अनधिकृत आणि इतर साईटवरुन डाउनलोड करतात ज्यावर गुगलचे नियंत्रण नसते. त "अँड्रॉइडसाठी गुगल प्ले प्रोटेक्टकडून प्री-डाउनलोड केलेले फेक व्हॉट्सअॅप व्हर्जन्स शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अँड्रॉइडसा डिव्हाइसवर फेक अॅप्स थांबवण्यासाठी आम्ही गुगलसोबत काम करत आहोत असं कॅथकार्ट म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com