WhatsApp New Feature : WhatsApp च्या नव्या फीचरमध्ये मिळणार 'ही' सुविधा, व्हिडीओ कॉलिंगदरम्यानही करता येणार अनेक काम !

व्हॉट्सअॅपच्या आगामी 'वॅबेटाइन्फो' या फीचरचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइट्सनी नव्या फीचरची माहिती दिली आहे
WhatsApp New Feature
WhatsApp New Feature Saam Tv

WhatsApp New Feature : मेटाच्या मालकीचा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप सतत नवीन फीचर्स आणि अपडेट्स युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी आणत आहे. आता व्हिडिओ कॉलिंग दरम्यान मल्टीटास्किंग करता यावे यासाठी व्हॉट्सअॅपने पिक्चर-इन-पिक्चर मोड आणला आहे.

या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअॅप (WhatsApp) व्हिडिओ (Video) कॉलिंग दरम्यान इतर अॅप्सचाही वापर करता येणार आहे. सध्या या फीचरची चाचणी घेतली जात आहे. चला जाणून घेऊयात की नुकतेच व्हॉट्सअॅपने बीटा टेस्टिंगसाठी कॉन्टॅक्ट कार्ड शेअर फीचर जारी केले आहे.

WhatsApp New Feature
Whatsapp New Feature : व्हॉट्सॲप आणणार यूझर्ससाठी नवं फिचर ; पाहा व्हिडीओ

पिक्चर-इन-पिक्चर मोड -

व्हॉट्सअॅपच्या आगामी 'वॅबेटाइन्फो' या फीचरचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइट्सनी नव्या फीचरची माहिती दिली आहे. वॅबेटाइन्फोच्या मते, व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव वाढवण्यासाठी हे फीचर आणलं जात आहे.

पिक्चर-इन-पिक्चर मोड फीचर्सच्या मदतीने युजर्स व्हिडिओ कॉलिंग करताना इतर अॅप्सचा वापर करू शकणार आहेत. म्हणजेच पिक्चर-इन-पिक्चरमध्ये तुम्ही इतर अॅप्सच्या स्क्रीनवर व्हिडीओ कॉलिंग सुरू ठेवू शकता. या फीचरच्या मदतीने युजर्स व्हिडिओ कॉलिंग दरम्यानही मल्टीटास्क करू शकणार आहेत.

WhatsApp New Feature
WhatsApp Chat Settings : WhatsApp ची 'ही' सेटिंग ऑन करा; मिनिटांत वाचा डिलीट केलेले मेसेज !

कॉन्टॅक्ट कार्ड शेअर फीचर -

व्हॉट्सअॅपचं कॉन्टॅक्ट शेअरिंग फीचर कॉन्टॅक्ट कार्ड शेअर बीटा टेस्टिंगसाठी जारी करण्यात आलं आहे. इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपच्या या फीचरच्या मदतीने आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप विंडोज अॅपसोबत कॉन्टॅक्ट्स सहज शेअर करू शकता.

सध्या व्हॉट्सअॅपच्या मोबाइल अॅपमध्ये कॉन्टॅक्ट शेअर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आता कंपनी विंडोज अॅपसाठीही हे फीचर रिलीज करणार आहे. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअॅप युजर्स सामान्य कॉन्टॅक्ट्सप्रमाणे सहज कॉन्टॅक्ट शेअर करू शकणार असून कॉन्टॅक्ट्स प्राप्त करणारे युजर्सही कोणत्याही बदलाशिवाय ते सेव्ह करू शकणार आहेत.

Edited By - Shraddha Thik

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com