WhatsApp Mistake : WhatsApp वापरताना 'ही' काळजी घ्या; अन्यथा जावं लागेल थेट तुरुंगात

व्हॉट्सअॅप वापराताना कोणत्या गोष्टी करू नयेत हे जाणून घ्या
WhatsApp Mistake
WhatsApp MistakeSaam Tv

WhatsApp Mistake : जगभरात आपल्या प्रिय व्यक्तीशी किंवा कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी WhatsApp आपल्याला मदत करते. कुटुंब आणि मित्रमैत्रिणींशी कनेक्ट राहण्याचा व्हॉट्सअॅप हा एक प्रमुख मार्ग बनला आहे. WhatsApp हे जगातील सर्वात मोठे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. जगभरात 2 अब्जाहून अधिक वापरकर्ते WhatsApp चालवतात.

वापरकर्ते केवळ संदेश पाठवून चॅट करू शकत नाहीत तर फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ फाइल्स एकमेकांशी शेअर करू शकतात. त्यामुळे त्याची व्यापकता आता खूप वाढली आहे. आता व्यावसायिक कामापासून ते अभ्यासापर्यंत व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. मात्र, त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला तुरुंगाच्या कारागृहात घेऊन जाऊ शकते.

मोठ्या कंपन्या, शाळा (School), रुग्णालयांपासून ते सरकारी विभागांपर्यंत व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. त्यामुळेच त्याची व्याप्ती खूप वाढली आहे. एकदा शेअर केलेला फोटो किंवा व्हिडिओ लगेच व्हायरल होतो. म्हणूनच व्हॉट्सअॅपचा वापर अत्यंत सावधगिरीने केला पाहिजे. येथे आम्ही तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगत आहोत, ज्या चुकूनही व्हॉट्सअॅपवर करू नयेत.

WhatsApp Mistake
WhatsApp Service : आता होणार WhatsApp च्या एका क्लिकवर Ola आणि Flight Booking; जाणून घ्या, कसे ?

1. चुकीच्या आणि खोट्या बातम्या शेअर करू नका

आजकाल व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे फेक न्यूज पसरवण्याचे सर्वात मोठे माध्यम बनले आहे. मात्र, खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपने अत्यंत कडक नियम आखले आहे. त्याच वेळी, सरकार फेक न्यूजच्या तक्रारीवर कठोर कारवाई देखील करते. तुम्हाला कोणताही मेसेज किंवा मीडिया फाइल मिळाल्यास, ते तपासल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

2. समाजात द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी शेअर करू नका

धर्म, जात, समुदाय इत्यादींच्या नावाखाली लोकांमध्ये भेदभाव पसरवणारा मजकूर शेअर करणे हा मोठा गुन्हा आहे. समाजातील शांतता व्यवस्थेला धक्का पोहोचवणारा किंवा भेदभाव पसरवणारा असा कोणताही संदेश तुमच्यापर्यंत आला तर तो त्वरित हटवावा. चुकूनही असे मेसेज किंवा फोटो-व्हिडीओ फॉरवर्ड करू नका. जर तुम्ही हे केले असेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

3. अश्लील फाईल्स शेअर करू नका

व्हॉट्सअॅपवर पॉर्न म्हणजेच अश्लील साहित्य शेअर करणे धोकादायक ठरु शकते. विशेषत: चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत पोलिस कडक कारवाई करतात. म्हणूनच व्हॉट्सअॅपवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ अजिबात शेअर करू नका. जर कोणी तुम्हाला पॉर्न संबंधित व्हिडीओ पाठवत असेल तर ती डिलीट करा. याशिवाय व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करणे, व्हॉट्सअॅपवर एखाद्याला धमकावणे, बनावट व्हॉट्सअॅप अकाऊंट तयार करणे किंवा फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगवासही होऊ शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com