Rejected Insurance Claim Form : इन्श्युरन्स कंपनीने तुमचाही क्लेम केला रिजेक्ट, कुठे करायची तक्रार? जाणून घ्या

Where To Complaint Againts Insurance Company : तुम्ही क्लेम करताना इन्शुरन्स कंपनीने दिलेल्या प्रतिसादाने तुम्ही समाधानी नसाल तर तुमच्याकडे तक्रार करण्याचे अनेक पर्याय आहेत.
Rejected Insurance Claim Form
Rejected Insurance Claim FormSaam Tv

Insurance Company Claim Rejects :

आपण अनेक प्रकारचे इन्श्युरन्स घेतले असतील आणि काही इन्श्युरन्सचे प्रीमियम देखील भरले असतील. परंतु कधीकधी काही विशेष कारणांमुळे, तुम्ही क्लेम केलेला इन्श्युरन्स संबंधित कंपनीकडून रिजेक्ट केला जातो. अशा स्थितीत तुमच्यासमोर एक समस्या उभी राहते.

IRDAI च्या नियमांनुसार, विमा दाव्यांबाबत कंपन्यांची (Company) स्वतःची पॉलिसी असते, ज्याच्या आधारे ते क्लेम नाकारतात. आता, तुम्ही तुमच्या गरजेनुसार अटींची पूर्तता करून क्लेम करत आहात असे गृहीत धरू; पण कंपनीने ते नाकारले, तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता.

Rejected Insurance Claim Form
Home Loanघेतलंय? पण घराचा विमा काढलाय का? काय आहेत Home Insurance चे फायदे जाणून घ्या!

कुठे तक्रार करू शकतो?

तुम्ही क्लेम करताना इन्शुरन्स (Insurance) कंपनीने दिलेल्या प्रतिसादाने तुम्ही समाधानी नसाल तर, तुमच्याकडे तक्रार करण्याचे अनेक पर्याय आहेत. तुम्ही तुमची तक्रार थेट भारतीय पॉलिसी नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) च्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदवू शकता. हे व्यासपीठ 'Bima Bharosa System' म्हणून ओळखले जाते. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, तुम्ही @irdai.gov.in या ईमेल आयडीद्वारे तक्रार देखील करू शकता .

टोल फ्री नंबरद्वारे तक्रारीचा पर्याय

आपण 155255 किंवा 1800 4254 732 डायल करून आपली तक्रार नोंदवू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही इन्शुरन्स कंपनीने नाकारल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत विमा लोकपालकडे तक्रार दाखल करू शकता. तुम्ही तुमची तक्रार https://www.cioins.co.in वर ऑनलाइन (Online) नोंदवू शकता किंवा तुमच्या जवळच्या लोकपाल कार्यालयात जाऊन तुमची तक्रार ऑफलाइन देखील नोंदवू शकता.

ग्राहक न्यायालयातही पर्याय आहे

इन्श्युरन्स क्लेम नाकारला असेल तर, तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता. जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचात कमी पैशांच्या दाव्याबद्दल तक्रार करू शकता. येथे तुम्ही ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा तक्रार लिहू शकता. लक्षात ठेवा की तक्रारीसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडलेली असणे आवश्यक आहेत.

Rejected Insurance Claim Form
Insurance Buying Tips : पहिल्यांदाच विमा काढताय? या गोष्टी तपासून मगच खरेदी करा

तुम्ही सादर केलेली सर्व तथ्ये आणि विधाने सत्य आणि बरोबर असल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला न्यायालयात दाखल करावे लागेल. ग्राहक मंच त्याच्या सुनावणीसाठी 100 ते 5,000 रुपये शुल्क आकारू शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com