
Utility News in Marathi: पूर्वी कॅश काढण्यासाठी लोकांना बँकांमध्ये लांबच लांब रांगा लावून तासनतास ताटकळत उभे राहावे लागत होते. मात्र नंतर एटीएमची सुविधा सुरू झाल्याने बँकांमध्ये फिरण्याचा त्रास संपला.
आता पैसे काढण्यासाठी लोक फक्त त्यांचे एटीएम कार्ड घेऊन जवळच्या एटीएम मशीन केबिनमध्ये जातात आणि 4 पिन कोड टाकून पैसे काढतात. यातच एटीएम पिनमध्ये फक्त चारच क्रमांक का असतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत...
आधी 6 अंकी होता एटीएम कोड
आता जरी आपण एटीएम मशिनमधून 4 नंबरची पिन टाकून पैसे काढतो, मात्र सुरुवातीला 6 नंबर एटीएम कोड होता. कारण सुरक्षेच्या दृष्टीने 4 पेक्षा 6 नंबरची पिन चंगळ होता, असं मानलं जात होतं. मात्र लोकांची होणारी गैरसोय आणि अनेकवेळा पिन विसरण्याची समस्या, यामुळे एटीएम पिन 4 नंबरी ठेवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. (Latest Marathi News)
असं असलं तरी आता 6 नंबरी पिन कुठेही वापरला जात नाही असे नाही. जगात असे अनेक देश आहेत, जिथे 6 नंबरचा एटीएम पिन आहे. 4 ऐवजी 6 पिन ठेवल्यास इतर कोणत्याही व्यक्तीला एखाद्याची पिन पटकन लक्षात ठेवणे सोपे होतं नाही. यामुळे पिन हॅक होण्याची शक्यता कमी होते.
भारतात लागला ATM चा शोधक (Inventor of ATM in India)
दरम्यान, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ज्या व्यक्तीने ATM चा शोध लावला त्याचा जन्म भारतात झाला होता. एटीएम मशीनचा शोध 1969 मध्ये लागला. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉन या स्कॉटिश शास्त्रज्ञाने एटीएम मशीनचा शोध लावला.
पण त्यांचा जन्म भारताच्या ईशान्येला असलेल्या शिलाँग शहरात झाला. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉनच्या शोधामुळे लोकांची आज एका मोठ्या समस्यांपासून सुटका झाली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.