International Clean Air Day: का साजरा करतात? जाणून घ्या...
International Clean Air Day: का साजरा करतात? जाणून घ्या...Plitvice Lakes National Park, Croatia. Romeo Ibrišević/WMO

International Clean Air Day: का साजरा करतात? जाणून घ्या...

International Clean Air Day: लॉकडाऊमुळे कधी नव्हे ती इतकी हवा शुद्ध झाली आणि आकाश निरभ्र व निळेशार दिसू लागले.

कोरोना महामारीमुळे संपुर्ण जग लॉकडाऊन करावं लागलं. भारतात २४ मार्च २०२० ला पहिलं लॉकडाऊन लावण्यात आलं, जे २१ दिवसांचं होतं. कोरोनाच्या सुरुवातीला पहिल्या लाटेत जवळपास संपुर्ण जग थांबलं होतं. आंतरराष्ट्रीय उड्डाणे, वाहतुक, उद्योगधंदे हे सर्वकाही बंद झालं होतं. यामुळे माणसाचं आर्थिक नुकसान झालं हे खरंय. पण लॉकडाऊनमुळे निसर्गाला परिणामी मानवालाही मोठा फायदा झाला होता. लॉकडाऊमुळे कधी नव्हे ती इतकी हवा शुद्ध झाली आणि आकाश निरभ्र व निळेशार दिसू लागले. (Why Celebrate International Clean Air Day lets Find out)

हे देखील पहा -

तो कसा काय? कारण, लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे, उद्योगधंदे सर्वकाही बंद होतं. त्यामुळे हवेतील प्रदुषणाचा स्तर अचानक कमी झाला परिणामी कधी नव्हे ती इतक्या दशकांनी माणसाने स्वच्छ हवा अनुभवली, कित्येक वर्षांनी निळेशार आकाश उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसू लागले. हे लॉकडाऊन निसर्गासाठी नवसंजीवनीच ठरले.

इंटरनॅशनल क्लीन एअर डे फॉर ब्लू स्काय

लॉकडाऊमुळे कधी नव्हे ती इतकी हवा शुद्ध झाली आणि आकाश निरभ्र व निळेशार दिसू लागले. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने (UNO) ७ सप्टेंबर २०२० हा दिवस इंटरनॅशनल क्लीन एअर डे फॉर ब्लू स्काय (International Clean Air Day) म्हणून घोषित केला. याच दिवसापासून आता प्रत्येक वर्षी हा 'निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा दिन' साजरा करण्यात येत आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे, त्यामुळे खुपच कमी लोकांना या दिवसाबद्दल माहिती आहे.

International Clean Air Day: का साजरा करतात? जाणून घ्या...
मनी हाईस्ट बॉलिवुडमध्ये बनला तर कोण असेल प्रोफेसर? जाणून घ्या सर्वांची नावे

पर्यावरणाच्या तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ हवा महत्वाची आहे. त्यामुळे हवा स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक व्यक्तीपासून ते प्रत्येक देशापर्यंत सर्वांचीच जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव करुन देत स्वच्छ हवेचा उद्देश पुर्ण व्हावा यासाठी या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com