Asthma Problem : हिवाळ्यात दम्याचा त्रास फार का वाढतो? जाणून घ्या कारणे

थंडीचे दिवस अस्थमाच्या रुग्णांसाठी खूप त्रासदायक ठरतात.
Asthma Problem
Asthma Problem Saam Tv

Asthma Problem : थंडीचे दिवस अस्थमाच्या रुग्णांसाठी खूप त्रासदायक ठरतात. वातावरणातील प्रदूषण वाढल्याने दम्याचा झटका येण्याचा धोका आणखी वाढतो.बऱ्याचदा अस्थमाग्रस्त लोकांना धुक्याचा प्रचंड त्रास होतो. मुख्य म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात त्यांना अधिक त्रास होतो. हवेत वाढणारे प्रदूषण कण आणि कमी होणाऱ्या तापमानामुळे अस्थमाच्या रूग्णांचा त्रास अधिक बळावतो.

अस्थमाच्या रुग्णांनी कोणत्याही बदलत्या हवामानात, सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसात थंड आणि कोरडे वारे वाहतात. अशा परिस्थितीत जुन्या रुग्णांमध्ये दम्याचा झटका येण्याचा धोका अधिक वाढतो, यासह नवीन रुग्णही थंडीत जास्त दिसून येतात.

भारतामध्ये सुमारे ६ हजार कोटी लोक अस्थमाच्या त्रासाचा शिकार झाले आहेत.वर्ल्ड अस्थमा फाउंडेशनच्या मते, भारतात दर वर्षी दमच्या त्रासने ग्रस्त ५ टक्क्याने रुग्णसंख्येत वाढ होते.चांगली गोष्ट ही आहे की आपण दर वर्षी दम्याबद्दल नियंत्रण आणि जागरूकता करत आहोत.

Asthma Problem
Asthma : बदलते वातावरण दम्याला कारण, वेळीच 'हे' सोपे उपाय करा!

दम्याची कारणे -

  • दम्याचा आजार होण्याची अनेक कारणे आहेत. अनुवांशिकता हे दम्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.

  • घरात कुणाला दम्याचा आजार असेल, तर अन्य सदस्यांना दमा होण्याची शक्यता असते.

  • दमा होण्यासाठी अ‍ॅलर्जी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असेल व त्या गोष्टीचा वारंवार संपर्क आला अथवा अ‍ॅलर्जी असलेल्या गोष्टींचे सेवन केले, तर रक्तातील काही घटक वाढतात. त्यातील 'इसोनिओफिल' नामक घटक वाढतो. त्यामुळे श्‍वासवाहिन्यांवर सूज येते.

  • वातावरणाचा आणि दम्याचा फार जवळचा संबंध आहे.

  • हिवाळा अथवा थंड वातावरण, धूळ व प्रदूषणयुक्त वातावरणदेखील दम्याचा आजार होण्यास पोषक असतात.

  • वातावरणातील प्रदूषणही दम्याचा आजार होण्यास कारणीभूत ठरतात. याशिवाय ब्रॉन्कायटिस, दीर्घकाळ असलेला कफ यामुळे दम लागू शकतो. धूम्रपान दम्याच्या आजारासाठी कारणीभूत ठरते.

Asthma Problem
Asthma Side Effects : अस्थमामुळे होऊ शकतो का आपल्या लैंगिक जीवनावर परिणाम ? यावर मात कशी कराल?

दम्याने ग्रस्त असलेल्या लोकांनी अशी घ्यावी काळजी -

  • दम्याने ग्रस्त असलेल्या रूग्णांनी सर्वप्रथम आपले उपचार योग्य वेळेत घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • तसेच या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी  नेहमी आपल्यासोबत रिलीव्हर इनहेलर ठेवावे.

  • प्रदूषित ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळ, डॉक्टरांनी जी काही औषधे दिली आहेत ती वेळेवर खावीत.

  • अशा लोकांनी पौष्टिक आहाराचे सेवन करावे. यासोबतच दम्याच्या रुग्णांनी स्टीम थेरपीची मदत घ्यावी.

  • त्याचबरोबर गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. मास्क वापरत राहा आणि धुळीपासून स्वत:चे सरंक्षण करा. 

'दम्याच्या रुग्णांनी कोविड काळात विशेष काळजी घेणे आवश्यक'

  • कोविड-19च्या पहिल्या टप्प्यातील कोरोनाच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकला, घशा खवखवणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येत होती.

  • पण आता पाठदुखी, डोकेदुखी, उलट्या होणे, दम लागणे, घशात खवखव आणि सर्दी होणे अशी अनेक लक्षणे कोविड-19च्या दुसऱ्या लाटेमध्ये दिसू लागली आहेत.

  • त्यामुळे इतर दम्याचे जे आजार आहेत, त्यामध्येही अशी काही लक्षणे दिसून येत असल्याने लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ लागला असल्याने दम्याच्या रूग्णांनी या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

  • दम्याच्या रुग्णांनी लसीकरण करुन घ्यावे

  • घरच्या घरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com