
Causes Going To Temples : प्रत्येक व्यक्ती देवांची पूजा अर्चना करत असतो. म्हणूनच आपण कोणत्याही अडचणीत असलो की, सर्वात आधी आपण देवाचे नामस्मरण करतो. परंतु हिंदू व्यक्तींच्या परिवारामध्ये दररोज देवी देवतांची पूजा केली जाते.
परंतु घरामधील पूजेसोबत (Pooja) मंदिरामध्ये देखील जात राहिले पाहिजे. परंतु दररोज मंदिरामध्ये जाण्याचे एक-दोन नाही तर तब्बल 36 लाभ आहेत. या लाभांना शास्त्रासोबत वैज्ञानिक आधारावर लाभकारी मांनले जाते.
पंडित सुरेश श्रीमाली असं सांगतात की देवदर्शन नियमित असावे. मंदिरामध्ये (Temple) जाऊन पूजा, प्रार्थनेचा सशक्त आधार असला पाहिजे. असं केल्याने जीवनामध्ये सुखद परिवर्तन, शांती, संपन्नता या गोष्टींचा विचार केल्याने तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दिसेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मंदिरामध्ये जाण्याचा नियम स्वतःसाठी स्वतःच बनवला पाहिजे.
धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने जाणून घ्या मंदिरात जाण्याचे लाभ -
* मंदिर जाण्याआधी सकाळी ब्रह्म मुहूर्तमध्ये उठण्याचा नियम बनला जातो. सकाळी लवकर उठल्यानंतर आपले नित्य कर्म म्हणजेच उषापान, दंत, शौच, धावन, स्नान या सगळ्या गोष्टींमधून निवृत्त होतो.
* स्वतःच्या घरापासून मंदिरापर्यंत चालत गेल्याने तुमचा भ्रमण व्यायाम होतो. सोबतच तुम्हाला प्राणवायू मिळतो आणि उगवत्या सूर्याची दिव्य लालीमाचे अवलोकन होते.
* मंदिराची घंटा सात सेकंद वाजवल्याने आणि त्या घंटेच्या आवाजावर लक्ष केंद्रित केल्याने तुमच्या आयुष्यामधील त्या दूर होण्यास मदत होते.
* मंदिरामध्ये देवाला फुल अर्पित केल्याने फुलांमधील सुगंधामुळे तुमच्या मनाला शांती प्राप्त होते.
* मंदिरामधील कापूर, अगरबत्ती, उदबत्ती यांच्या सुगंधामुळे तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहतात. तुमच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.
* जेव्हा मंदिरामध्ये आरतीदरम्यान आपण टाळ्या वाजवतो तेव्हा, आपल्या हातांचे एज्युकेशन पॉईंट दाबले जातात आणि त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते.
* आरती दरम्यान म्हटल्या जाणाऱ्या चालीसामुळे तुमची वाणी सुधारते. ओमच्या उच्चारणाने तुमचे मन एकाग्रह होण्यास मदत होते.
* प्रत्येक मंदिरामध्ये गो हत्या किंवा गो रक्षा करणे बंद व्हावे याचा एकत्र येऊन संकल्प केला जातो.
* आरती नंतर आपण आपला हात दिव्यावरती फिरवतो. असं केल्याने तुम्हाला दिव्य उष्णता प्राप्त होईल.
* दिव्यावरती हात ठेवणे हे आपण केलेल्या चुकांची माफी मागण्यासारखेचं आहे.
* मंदिरामध्ये सूर्याला जल अर्पित करून त्याच्या अलौकिक किरणांनी लाभान्वित होते.
* मंदिराच्या बाहेर येताना घंटी वाजवणे म्हणजेच आपण सांसारिक जबादारीमध्ये पुन्हा येत आहोत.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.