Home Rent Agreement: भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठीच का केला जातो, त्याचा लाभ घरमालकांना मिळतो का?

भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठीच का केला जातो, त्याचा लाभ घरमालकांना मिळतो का?
Home Rent Agreement
Home Rent AgreementSaam Tv

Home Rent Agreement: जेव्हा आपण भाड्याने घर घेतो तेव्हा भाडे करार करणे आवश्यक असते. या करारावर घराच्या भाड्यापासून ते सर्व प्रकारचे तपशील लिहिलेले असतात. या कराराचा तात्पुरता पत्ता पुरावा म्हणून देखील उपयोग करता येतो.

असं असलं तरी घर भाडे करार कधीही एका वर्षासाठी केला जात नाही? हा नेहमी फक्त 11 महिन्यांसाठीच का केला जातो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. यामागे नेमकं काय कारण आहे, याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Home Rent Agreement
Difference between good and bad Loan: सावधान! कर्ज काढताय ? होऊ शकते लाखोंच नुकसान, गुड आणि बॅड लोनबाबत माहीतेय का ?

भाडे करार काय असतं?

भारतीय नोंदणी अधिनियम 1908 च्या कलम-17 (डी) अंतर्गत घर भाडेपट्टीवर घेण्यात येणारा करार एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी केला जातो. हा करार घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील करार आहे. ज्यामध्ये भाडेकरू आणि घर मालक यांच्यातील निश्चित अटी लिहिल्या जातात. (Latest Marathi News)

भाडे करार 11 महिन्यांसाठी का केला जातो?

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील बहुतांश कायदे भाडेकरूच्या बाजूने आहेत. अशा परिस्थितीत भाडेकरू आणि मालक यांच्यात वाद झाल्यास घर रिकामी करणे फार कठीण होऊन बसते. अनेक प्रकरणांमध्ये मालमत्ताधारकांना स्वतःची मालमत्ता परत मिळवण्यासाठी दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागला. म्हणूनच भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठी केला जातो. मात्र 100 किंवा 200 रुपयांच्या या भाडे कराराला कायदेशीर वैधता नाही. (Viral Video News)

Home Rent Agreement
Gold Silver Price Down : सुवर्णसंधी ! सोन्या-चांदीचे भाव नरमले, तपासा आजचे दर

याशिवाय भारतीय नोंदणी कायद्यानुसार 12 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी भाडे करार करण्यासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क देखील भरावे लागते. म्हणून हा खर्च टाळण्यासाठी बहुतेक भाडेकरू आणि घरमालक केवळ 11 महिन्यांसाठी भाडे करार करतात. (Lifestyle News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com