Folic acid benefits : गर्भावस्थेत फॉलिक अॅसिड अधिक गरजेचे का असते ?

गरोदरपणात आपल्याला अनेक पोषक आहार खाण्याचा सल्ला दिला जातो.
Folic acid benefits, pregnancy tips
Folic acid benefits, pregnancy tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गरोदरपणात आपल्याला अनेक पोषक आहार खाण्याचा सल्ला दिला जातो. पहिल्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत बाळाच्या वाढीसाठी अनेक पोषक घटक खायला दिले जातात.

हे देखील पहा-

गरोदरपणात डॉक्टर आपल्याला अनेक औषधे लिहून देतात त्यातील एक फॉलिक अॅसिड. फॉलिक अॅसिडमध्ये जीवनसत्त्व ब -९ आढळते. पण औषधांमध्ये नैसर्गिक रुप आढळून येत नाही. जीवनसत्त्व ब -९ च्या सिथेंटिक रुपात फोलेटची पूर्तता होत नसल्यास ते आपल्याला औषधांच्या मार्फत दिले जाते. फॉलिक अॅसिड आपल्याला पॅक्ड अन्नातून मिळू शकते पण डॉक्टरांच्या (Doctor) सल्ल्याशिवाय यासाठी घ्यावा.

१. आपल्या आहारात रोज फॉलिक अॅसिडचे प्रमाण किती असायला हवे ?

फॉलिक अॅसिडही आपण कोणत्याही पौष्टिक घटकाप्रमाणेच रोज एका ठराविक घटका प्रमाणे घ्यायला हवे. वय व परिस्थितीनुसार याचे योग्य प्रमाणात सेवन करा. यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो.

Folic acid benefits, pregnancy tips
Eucalyptus oil benefit : अनेक वेदनांपासून निलगिरीचे तेल देईल आराम !

२. गर्भावस्थेत का गरजेचे ?

बऱ्याच महिला गर्भधारणेच्या प्रारंभिक महिन्यांमध्ये वैद्यकीय सल्ला टाळतात. डॉक्टरांचा सल्ला उशिरा घेतल्यामुळे त्यांना गर्भावस्थेत आवश्यक ते पोषक घटक मिळू शकत नाही. यापैकी एक आहे फॉलिक अॅसिड. हे गरोदरपणाच्या सुरुवातीपासूनच घ्यायला हवे. गर्भधारणेच्या तीन ते चार आठवड्यांत बाळाचा मेंदू व कणा बनण्यास सुरूवात होते. अशावेळी फॉलिक अॅसिडचा अभाव बाळाच्या विकासात उणीव आणू शकतो वा त्याचा जन्म अकालीही होऊ शकतो.

३. असा होईल फॉलिक अॅसिडचा फायदा -

गर्भावस्थेत आपण सारे काही फक्त बाळासाठीच (Baby) घेत नसतो. यात आईची तब्येतही महत्त्वाची असते. फॉलिक अॅसिड बाळासोबत आईचीही काळजी घेते. याचे सेवन केल्याने हृदयाघात, हृदयरोग, कॅन्सर आणि अल्झायमरसारखे आजार दूर होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com