International Girl Child Day : आंतरराष्ट्रीय बालिका दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या, यंदाची थीम

दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो.
World Girl Child Day
World Girl Child DaySaam Tv

International Girl Child Day : २०२२ मध्ये मुलीच्या (Female) आंतरराष्ट्रीय दिनाच्या १० व्या वर्धापन दिनाचे स्मरण करतो. या गेल्या १० वर्षांत, सरकार, धोरणकर्ते आणि सामान्य लोकांमध्ये मुलींसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे आणि मुलींना जागतिक (World) मंचावर त्यांचा आवाज ऐकवण्याच्या अधिक संधी मिळाल्या आहेत. तरीही, मुलींच्या हक्कांमधली गुंतवणूक मर्यादित राहते आणि मुलींना त्यांची क्षमता पूर्ण करण्यासाठी असंख्य आव्हानांचा सामना करावा लागतो.

दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा २०१२ मध्ये साजरा करण्यात आला.हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना त्यांचे हक्क प्रदान करणे, जेणेकरून ते जगभरातील त्यांच्यासमोरील आव्हानांना तोंड देऊ शकतील आणि त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील.

World Girl Child Day
World Mental Health Day: मानसिक आरोग्य उत्तम राखायचे आहे ? तर 'या' टिप्स फॉलो करा, चिंता आणि नैराश्यापासून राहाल दूर

थीम -

यंदा आंतरराष्ट्रीय बालिका दिन २०२२ ची थीम 'आता आमची वेळ - आमचे हक्क, आमचे भविष्य

World Girl Child Day
World Mental Health 2022 : आहारात 'हे' पदार्थ नसतील तर, कमजोर होऊ शकते मेंदूचे आरोग्य !

इतिहास -

आंतरराष्ट्रीय स्तरावर बालिका दिन साजरा करण्याचा पहिला उपक्रम 'प्लॅन इंटरनॅशनल' या स्वयंसेवी संस्थेचा प्रकल्प म्हणून करण्यात आला. या संस्थेने 'क्योंकी मैं एक लड़की हूं' नावाची मोहीम सुरू केली. यानंतर ही मोहीम आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवण्यासाठी कॅनडा सरकारशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर कॅनडा सरकारने हा प्रस्ताव ५५ व्या आमसभेत ठेवला.अखेरीस हा ठराव संयुक्त राष्ट्रांनी १९ डिसेंबर २०११ रोजी संमत केला आणि ११ ऑक्टोबर हा दिवस साजरा करण्यासाठी निवडण्यात आला.

Edited By : Shraddha Thik

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com