Mobile Camera Facts : स्मार्टफोनचा मागचा कॅमेरा डाव्याच बाजूलाच का ? जाणून घ्या

Mobile Camera : तुम्ही एक गोष्ट नोटिस केली असेल स्मार्टफोनचा कॅमेरा हा नेहमी डाव्या बाजुलाच असतो.
Mobile Camera Facts
Mobile Camera FactsSaam Tv

Camera Facts : आजकाल दिवसभरात जर काही आपल्या जवळ राहते तर ते म्हणजे आपला स्मार्टफोन. पूर्वी दूरवर बसलेल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींशी बोलण्यासाठी मोबाईलचा वापर केला जायचा, पण आता मोबाईल फोन खूप प्रगत होऊन लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे.

आपल्या गरजेची बरीचशी कामे आता मोबाईल फोनच्या मदतीने काही मिनिटांतच पार पाडली जातात. जगभरात वेगवेगळ्या कंपन्या आपले नवीन नवीन स्मार्टफोन लाँच करीत आहेत. स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे अपडेट देत आहेत. स्मार्टफोन (Smartphone) हा आपल्या आयुष्याचा भाग बनले आहे. मोबाइल मुळे अनेक काम घरी बसून केली जातात. सोबत मनोरंजन केले जाते.

Mobile Camera Facts
Mobile Side Effects : मोबाईलमुळे वाढतो उच्चरक्तदाबाचा धोका, हृदयावर होतो दुष्परिणाम! संशोधनातून धक्कादायक खुलासा

जर तुमच्याकडे सुद्धा स्मार्टफोन असेल तर तुम्ही एक गोष्ट नोटिस केली असेल स्मार्टफोनचा कॅमेरा (Camera) हा नेहमी डाव्या बाजुलाच असतो. परंतु, तो कॅमेरा डाव्या साइडलाच का असतो, असा प्रश्न अनेकांना पडत नाही किंवा पडला असेल. परंतु, त्याचे उत्तर माहिती नसेल.

वास्तविक, जे फोन (Phone) सुरुवातीला यायचे, त्यात कॅमेरा मध्यभागी दिला जायचा. मग हळूहळू सगळ्या कंपन्यांनी (Company) मोबाईलच्या डाव्या बाजूला कॅमेरा केला. आता प्रश्न येतो की असे का केले गेले? कंपन्या मोबाईलच्या डाव्या बाजूला कॅमेरा का देतात? चला जाणून घेऊया.

Mobile Camera Facts
Canon Pocket Size Camera : आता Vlogging करणे अधिक सोपे ! Canon ने लॉन्च केला पॉकेट साइज कॅमेरा, जाणून घ्या किंमत

आयफोन सुरू झाला -

आयफोनने सर्वप्रथम डाव्या बाजूला कॅमेरा देण्यास सुरुवात केली. यानंतर, हळूहळू बहुतेक कंपन्यांनी हाच पॅटर्न स्वीकारला आणि कॅमेरा फोनच्या डाव्या बाजूला शिफ्ट केला. कॅमेरा डाव्या बाजूला ठेवण्याची कोणतीही रचना नाही, पण त्यामागे दुसरे काही कारण दिले आहे.

ही कारणे आहेत -

जगातील बहुतेक लोक डाव्या हाताने मोबाईल वापरतात. अशा परिस्थितीत मोबाईलच्या मागच्या आणि डाव्या बाजूला बसवलेल्या कॅमेराने फोटो काढणे किंवा व्हिडिओ शूट करणे सोपे होते. याशिवाय मोबाईल फिरवून लँडस्केप मोडमध्ये फोटो काढावा लागतो, तेव्हाही मोबाईलचा कॅमेरा वरच्या बाजूला राहतो, त्यामुळे लँडस्केप मोडमध्येही फोटो सहज काढता येतो. या कारणांमुळे मोबाईलच्या डाव्या बाजूला कॅमेरा दिला जातो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com