Why Shirt's Pocket on Left Side : शर्टाच्या डाव्या बाजूलाच खिसा का असतो ? जाणून घ्या

Shirt's Pocket on Left Side : पेन, डायरी, मोबाईल फोन किंवा इतर कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही अनेकदा शर्टच्या खिशाचा वापर करता.
Why Shirt's Pocket on Left Side
Why Shirt's Pocket on Left Side Saam Tv

Why Pocket on Left Side : पेन, डायरी, मोबाईल फोन किंवा इतर कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही अनेकदा शर्टच्या खिशाचा वापर करता. पण, तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की शर्टचे सर्व खिसे बहुतांशी डावीकडे का असतात? हा प्रश्न शर्ट शिवणाऱ्या टेलरला विचारला तर खिसा फक्त डाव्या बाजूला का ठेवला जातो तर तो ही प्रश्नात पडेल.

हल्ली स्त्रियाही (Women) शर्ट घालू लागल्या आहेत. पूर्वी महिलांच्या शर्टमध्ये खिसे नव्हते. महिलांच्या कपड्यांमध्ये (Cloths) पाकिटांचा ट्रेंड खूप नंतर आला आहे.

Why Shirt's Pocket on Left Side
Buttons Of Women's Shirts : मुलींच्या शर्टाची बटणे डाव्या बाजूला का असतात ? जाणून घ्या, 'या' मागचे कारण

पूर्वी मुलींच्या जीन्समध्येही (Jeans) खिसे नसायचे. पण काळानुसार बदल झाला आणि त्यांची गरज लक्षात घेऊन खिसे देण्याची प्रथा सुरू झाली.

शर्टाच्या डाव्या बाजूला खिसा असण्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही. परंतु, यामागचे एक मोठे कारण म्हणजे बहुतेक लोक उजव्या हाताचे आहेत.

Why Shirt's Pocket on Left Side
Summer Sports T- Shirts : फिट है बॉस! जिम असो वा रनिंग, उन्हाळ्यात हे Sports T- Shirts ठरतील बेस्ट...

जगातील बहुतेक लोक उजव्या हाताने काम करातात त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी, गरजेसाठी आणि वस्तू सहजपणे ठेवता येतील आणि काढता येतील या कारणांनी डाव्या बाजूला एक खिसा बनवला जातो.

तसे, बर्याच शर्टमध्ये उजव्या बाजूला एक खिसा देखील असतो. त्याच वेळी, आजच्या फॅशनच्या युगात, अनेक शर्टच्या दोन्ही बाजूंना खिसे देखील असतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com